बौद्ध अभियंता तरुणाचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न 

औरंगाबाद : .लग्नाचे आमिष दाखवून एका मुस्लीम कुटुंबीयांनी दिपक सोनवणे या बौद्ध अभियंताचा मुस्लीम धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांनी शुक्रवार, दि. 18नोव्हेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत केला यामागे खासदार इम्तियाज जलील यांचे आशीर्वाद असल्याचेही त्यांनी आरोप केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही तर,   या तरुणाचा खतनाही केल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला रवी एडके, आप्पासाहेब कीर्ति शाही, राजू जाधव, दीपक सोनवणेंची आई उपस्थित होती.

जालिंदर शेंडगे म्हणाले की, देवळाई परिसरातील दीपक रामदास सोनवणे व सना फरहिन शेख हे दोघे 2018 पासून ’एमआयटी कॉलेज’मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. दोघांचे प्रेमसंबंध जुळले. सना हिने दीपकला लग्नाचे अमिष दाखवले व त्याच्याकडून वारंवार पैशांची मागणी करू लागली. दीपकने तिला ऑनलाईन पद्धतीने आतापर्यंत 11 लाख रुपये दिले. परंतु, त्यानंतर सनाने दीपकला सांगितले की, लग्न करायचे असेल तर इस्लाम कबुल करावा लागेल.

परंतु, त्याने नकार देताच ख्वाजा सय्यद व शहामीर शेखए शबाना बेगम सांझिया सदप यांनी दिपकला जीवे मारण्याची धमकी देत त्याला मारहाण केली. त्याचा व्हिडीओही बनवला. त्यानंतर त्यांनी दिपकला दवाखान्यात नेले. तिथे त्याचा जबरदस्तीने खतना केला आणि पुन्हा दीपकला त्याच्या परिसरात सोडून दिले. या घटनेनंतर सना दीपकला म्हणाली की, “25 लाख रुपये दे नाहीतर मुस्लीम धर्म स्वीकार.” पीडित दिपकने नकार दिल्यावर सना हिने दीपकवर ‘सिडको एमआयडीसी’ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. दिपकनेही या सगळ्याच्या विरोधात वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता.

याबाबत पीडित तरूण दीपक सोनावणे यांचे म्हणणे आहे की, दि. 20 ऑगस्ट रोजी या सगळ्या घटनाक्रमाचा दाखला देत, खासदार जलील यांच्यासमोरच त्यांचा बॉडीगार्ड व शहामिर शेख खाजा बेगम उर्फ शबाना शेख व इतर चार ते पाच अनोळखी इसमानी त्याला मारहाण केली. खासदारांच्या बॉडीगार्डने दीपकचा मोबाईल घेतला. दीपक याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या पत्रकार परिषदेमध्ये पीडित तरूण दीपक सोनवणे यानेही आपली आपबिती सांगितली.

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

खा. इम्तियाज जलील हे दलित मतदारावर निवडून आलेले आहेत. त्यांनी अशा प्रकारे वर्तन करणे योग्य नाही. पोलिसांनी या घटनेची गंभीर्याने दखल घेतली नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेे दाद मागणारा आहोत. दलित अत्याचारविरोधी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यात येईल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

-जालिंदर शेंडगे, प्रदेश सरचिटणीस, भाजप अनुसूचित जाती मोर्चा