तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । मुंबईतील एका इमारतीला आग लागल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आगीच्या बळक्याने खिडकीतुन बाहेर पडलेली तरुणी खिडकीबाहेरील सज्जावर उभी होती. तिला शिडीच्या आधारे उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु, नाईलाजाने तिला उडी मारावी लागली. यात कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.
सूत्रानुसार, मालाड पश्चिम येथील जनकल्याण नगरमधील 22 मजली मरिना एन्क्लेव्ह इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील एका घरात शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आग लागली. यानंतर ती पसरत जाऊन अन्य दोन घरांना कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक तासाचा कालावधी लागला.
दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच तेथील रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. अन्य एका घरातील तरुणी खिडकीतून बाहेर पडली. मात्र, ती बराच वेळ खिडकीबाहेरील सज्जावर उभी होती. आगीच्या ज्वाळा वाढत असल्याने तिला शिडीच्या आधारे उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु, नाईलाजाने तिला उडी मारावी लागली. यात कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.