---Advertisement---

Bhusawal Crime News: भुसावळ शहरात व्यापाऱ्याच्या घरात चोरी

by team
---Advertisement---

भुसावळ : घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी शांती नगराजवळील सोपान कॉलनीतील घरातून २८ हजारांचा ऐवज लंपास केला. घरफोडीची ही घटना २४ ते २५ दरम्यान घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील शांती नगराजवळील सोपान कॉलनीत परमजीतसिंह दलविंदरसिंह बन्सल (४२, रा.श्रीगंगा नगर, वांजोळा रोड, भुसावळ) यांचे घर आहे. २४ ते २५ मार्च दरम्यान घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील टीव्ही, साऊंड सिस्टीम, फॅन आणि १५ हजारांची रोकड मिळून २८ हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार मंगळवार, २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आला.

परमजीतसिंह बन्सल यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इकबाल सैयद करीत आहे. दरम्यान, वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिक धास्तावले असून गस्त वाढवण्याची अपेक्षा आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment