घरफोडी करून दागिने लंपास करणारा चोरटा जेरबंद

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिसांत घरफोडी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली आहे. इस्तीयाक अली राजीक अली (वय १९, रा. तांबापुरा जळगांव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

रामानंदनगर पोस्टे सीसीटीएनएस गुरंन ३२९ / २०२२ भा.द.वि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे सदरचा गुन्हा अज्ञात आरोपी विरूद्ध दाखल होता, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना, गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे गोडावून चे कडी कोंडा तोडुन सोन्याचे चांदीचे वापरते दागिने, लॅपटॉप, मोबाईलची चोरी झालेली असून ती चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार इस्तीयाक अली राजीक अली रा. तांबापुरा जळगांव याने त्याचे साथीदारासह केली आहे, अशी गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील प्रीतम पाटील, अविनाश देवरे सर्व नेमणुक स्था.गु.शा, अशांना आदेश दिल्याने सदर पथकाने तांबापुरा जळगांव भागात जावुन शोध घेता माहीती मिळाली की, तो शामा फायर चौक तांबापुरा येथे उभा असल्याची माहीती मिळाली.

दरम्यान, सदर पथकाने सापळा रचून वरील आरोपीतास ताब्यात घेऊन त्यास वर नमुद गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदारसह केला असल्याचे कबुल केल्याने रेकॉर्डवरील आरोपी नामे १) इस्तीयाक अली राजीक अली वय १९ रा. तांबापुरा जळगांव यांस गुन्हयाकामी ताब्यातघेऊन सखोल विचारपुस करून गुन्हा उघडकीस आणला आहे.