नंदुरबार : नवापूर आगारातील ‘नवापुर-पुणे’ बसने ट्रकला मागून धडक दिल्याची घटना ३१ रोजी दुपारी कोंडाईबारी घाटात घडली. या अपघातात २२ प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांना दहिवेल, साक्री, विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी १ वाजेच्या दरम्यान नवापुर आगाराची नवापूर-पुणे बस ( क्र.एम.एच.20 .बी.एल. 3201) ही पुण्याकडे प्रवासी घेऊन जात होती. दरम्यान, कोंडाईबारी घाटात मंदिरा समोर उभा असलेल्या मालट्रकला मागून धडक दिली. यात बसमधील 20 ते 22 प्रवासी जबर जखमी झाले. काही प्रवासी ना दहिवेल, साक्री, विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनास्थळी कोंडाईबारी महामार्ग सुरक्षा पोलीस , विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी परिस्थितीकडे बघता ताबडतोब महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, बस चालक मोबाईलवर बोलत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा आरोप प्रवाशी केला.