कापूस खरेदीस प्रारंभ : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापसाला मिळाला 7,153 रुपयांचा भाव

धरणगाव : सालाबादाप्रमाणे यावर्षीही शहरातील जळगाव रोडवरील श्रीजी जिनिंग ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शनिवारी कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी कापसाला 7,153 रुपये कापसाला प्रति क्विंटल भाव मिळाला.

शनिवारी सकाळी दहाला झालेल्या कापूस खरेदी शुभारंभाच्या कार्यक्रमात अनेक शेतकरी बांधव, व्यापाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

श्री गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून शुभारंभ करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. प्रारंभी कापूस पूजन नीलेश सुरेश चौधरी, शिल्पेश नयन  गुजराथी, निखिल जीवनसिंग बयस व सागर प्रकाश कर्वा यांच्या हस्ते करण्यात आला.

कापूस खरेदीचा भाव प्रति क्विंटल 7,153 रुपये शेतकऱ्याला मिळाला. कापूस खरेदी शुभारंभासाठी श्रीजी ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरीचे संचालक सुरेश  चौधरी, नयन गुजराथी, जीवनसिंग बयस व बऱ्हाणपूर येथील सरकी व्यापारी सोहनलालजी, मोहनभाई, योगेंद्रभाई, खामगावचे अनिल थानवी, चाळीसगावचे ठक्करजी, गाठींचे व्यापारी, अंजळ येथील रामभाई जडेजा, देवेंद्र  मलविया, प्रवीण पाटील, राजस्थान येथील रामनाथ चौधरी, महेश शर्मा, शिवकुमार शर्मा, सुशील शर्मा, सूर्य लक्ष्मी टेक्सटाईलचे गौतम शर्मा, अमरावतीचे आत्माराम सुर्से, खर्गोन येथील व्यापारी जंबूशेठ तसेच कल्याणशेठ सर्व कर्मचारी वृंद व शेतकरी बांधव उपस्थित होते.