---Advertisement---

अमळनेरात अग्रवाल कुटुंबाची सी.ए. परंपरा कायम, यशवी अग्रवाल उत्तीर्ण

---Advertisement---

येथे सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या व उद्योग क्षेत्रात विशेष नावलौकिक प्राप्त केलेल्या बजरंगलाल अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी राधेश्याम अग्रवाल ही नुकतीच सी.ए. (चार्टर्ड अकाउंटेंट) ही अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे.

या परिवाराचे वैशिष्ट्य म्हणजे या परिवारात आधी पाच जण सी. ए. झालेले असून, यशवी ही सहावी सी. ए. झाली आहे. यशवीचे वडील राधेश्याम अग्रवाल व काका नीरज अग्रवाल दोन्ही सी. ए. आहेत. या व्यतिरिक्त काकू ममता नीरज अग्रवाल, मोठी बहीण आणि जिजाजी हेदेखील सी.ए. आहेत. यशवीच्या सातत्यपूर्ण अभ्यासाने, कठोर परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने हे यश तिने मिळवले आहे.

तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, कुटुंबियांचेदेखील अभिनंदन होत आहे. उद्योजक बजरंगलाल अग्रवाल यांची ती नात आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---