Cabinet Expanssion : मोठी बातमी ! ‘या’ मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

#image_title

मुंबई ।  राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नागपूरमध्ये आज संध्याकाळी होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारानंतर उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना स्थान मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

संभाव्य मंत्रिपदांसाठी हे नावं चर्चेत
सना मलिक (नवाब मलिक यांची मुलगी) : मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गटाकडून त्यांना फोन गेल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

नरहरी झिरवळ : ते पहिल्यांदाच मंत्री होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते: छगन भुजबळ, आदिती तटकरे, आणि धनंजय मुंडे यांची नावे संभाव्य मंत्रीपदांसाठी चर्चेत आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चा वाढली 

या विस्तारामुळे पक्षांतर्गत संतुलन कसं ठेवण्यात येईल, याबद्दल चर्चा सुरू आहे. संभाव्य मंत्र्यांची नावे अधिकृतरीत्या घोषित झाल्यानंतर याबाबत अधिक स्पष्टता येईल.

दरम्यान, महायुती सरकारचा हा विस्तार आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग मानला जात आहे. मंत्रिपद मिळणाऱ्या नेत्यांची कार्यक्षमता आणि पक्षाला मिळणारा राजकीय फायदा लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे.

नागपूरमध्ये आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याने अनेकांच्या नजरा या ऐतिहासिक क्षणावर खिळल्या आहेत. भाजपचे २१, शिवसेनेचे १२, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १० मंत्री आज शपथ घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा सोहळा आज दुपारी ३ वाजता होणार असून, त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, नागपूरमध्ये ३३ वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. यापूर्वी १९९१ मध्ये नागपूरमध्ये असे शपथविधी पार पडले होते. या पार्श्वभूमीवर, आजचा सोहळा केवळ राजकीय नव्हे तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे.