महिलेचा विनयभंग करणऱ्या नराधमावर कठोर कारवाईची मागणी सकल हिंदु समाजाने पोलीस आयुक्तांना केली

ठाणे : ठाण्याच्या हाजुरी भागात विशिष्ट समाजाकडून धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने कारस्थाने सुरु आहेत. कायद्याचे भय नसलेल्या समाजाकडून मंदिरांचीही विटंबना केली जात आहे. असा आरोप सकल हिंदु समाजाने केला असून काही दिवसांपूर्वी एका अबलेचा पाठलाग करीत घरात घुसून विनयभंग करणाऱ्या शहजाद शेख या नराधमसह जिहादी उन्माद करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी हिंदु संघटना व भाजपच्या पदाधिकाऱ्यानी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणीही हिंदु संघटनांनी केली आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात काही दिवसांपूर्वी भरवस्तीत दिवसाढवळ्या एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. नराधम शहजाद शेख याने सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने दिवसाढवळया घरात घुसुन पिडितेचा विनयभंग केला होता. यावेळी एक प्रकारे पश्चिम बंगाल सदृश्य स्थिती झाल्याने हाजुरी परिसरात तणाव पसरला होता. या प्रकरणी पिडित महिलेच्या मदतीला स्थानिकांनी धाव घेताच वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात विशिष्ठ समाजाच्या शेकडोच्या जमावाने आरोपीच्या बचावार्थ दबाव टाकला होता. स्थानिक राजकिय पदाधिकाऱ्यानीही पोलिसांवर दबाव टाकला होता. अखेर, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून उशिरा आरोपीला अटक केली. त्या आरोपीची तात्काळ जामिनावर मुक्तता झाल्याने हिंदु समाज आक्रमक झाला आहे.

दरम्यान, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, याकरीता सकल हिंदु समाज तसेच भारतीय स्त्री शक्ती, राष्ट्र सेविका समिती, हिंदू जागरण मंच, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, शिव शंभू विचार मंच आदी संघटनानी शनिवारी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.या निवेदनात म्हटल्यानुसार, हाजुरी येथील हिंदू रहिवासी अत्यंत असुरक्षित झाला आहे. अनेक महिन्यांपासून हिंदूवर अत्याचार करून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. दिनांक २३ जून रोजी हिंदू महिलेच्या घरी शहजाद शेख याच्याकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला. स्वतःला वाचवण्यासाठी पिडीत महिलेने परिसरातील शिव मंदिरात आश्रय घेतला. तेव्हा, १००-१५० मुस्लिम मंदिर परिसरात घुसले आणि पीडित महिलेला बाहेर येण्यास सांगितले.

त्यांनी बाहेर येण्यास नकार दिल्यावर, सर्वजण चप्पल-बूट घालून मंदिरात घुसून मंदिराची विटंबना करीत धमक्या दिल्या. या घटनेमुळे हिंदूंच्या मंदिराचे पावित्र्य भंग झाले असुन धार्मिक तणाव निर्माण झाल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या प्रकाराने हिंदू समाजात असुरक्षितता व रोष निर्माण झाला आहे. पोलिसांनी तात्काळ भा. द. वि. कलम २९५(अ) आणि १५३ नुसार दोषींवर गुन्हा दाखल करावा तसेच इफ्राक सिद्दिकी आदी अन्य जिहादी नेत्यांवर कारवाई करण्यात यावी. भविष्यकाळात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलावीत. जर तात्काळ कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदु समाजाचे विजय त्रिपाठी यांनी दिला आहे.