जळगाव : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार आज शनिवार, ११ रोजी संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघाचा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
जळगाव आणि रावेर मतदारसंघांसह अन्य ११ मतदारसंघामधील प्रचारतोफा शनिवार, ११ रोजी संध्याकाळी सहानंतर प्रचार थांबणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात सोमवार, १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विधान परिषदेच्या माजी सदस्या स्मिता वाघ, उबाठा गटाचे करण पवार, तर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील, बसपाचे संजय ब्राम्हणे हे प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. आतापर्यंत जळगाव व
लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तसेच महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या प्रचार सभा झाल्या आहेत. ११ मे रोजी संध्याकाळी प्रचार थांबल्यानंतर घरोघरी जावून प्रचार करण्यावर उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा जोर राहणार आहे. लक्षवेधी लढती खानदेशात जळगाव जिल्ह्यातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार हे मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले आहेत. जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे व नंदूरबारमधून डॉ.हिना गावीत या निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात जळगावमधून उबाठा गटाचे करण पवार यांच्यासह अन्य १२ उमेदवार तर रावेरमधून राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यासह अन्य २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नंदुरबारमधून भाजपच्या डॉ, हिना गावीत यांच्याविरोधात कॉग्रेसचे गोपाल के. पाडवी व अन्य ९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
रावेर कोणत्या मतदारसंघात प्रचार थंडावणार?
नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार आहे. सार्वत्रिक निवडणूक चौथ्या टप्याची अधिसूचना १८ एप्रिल रोजी निघाली होती. २५ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे होते. २९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घ्यायचे होते. त्यानुसार अर्ज माघारीनंतर जळगाव मतदारसंघात १४ तर रावेर मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यानंतर सर्व उमेदवार जोरदार प्रचारात व्यस्त झाले होते. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना तुलनेने प्रचारासाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यात उन्हाचा कडाका असल्याने त्याचाही सामना उमेदवार व प्रचार करणाऱ्या मंत्री आमदार खासदारांसह प्रमुख नेत्यांना करावा लागला. प्रचाराला मिळालेला वेळ शनिवार सायंकाळी संपणार असून आता ११ लोकसभा मतदारसंघासह जळगाव व रावेर या मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.