---Advertisement---

भांडी वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करा अन्यथा सामुदायिक आत्मदहन : संघर्ष समितीचा इशारा

---Advertisement---

---Advertisement---

सोलापूर : बांधकाम कामगारांना पैसे घेऊन, भांडी वाटप करणारे अक्कलकोट विभागाचे भांडी वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करा., अन्यथा गुरुवारी (३१ जुलै ) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदह करण्याचा निर्धार संघर्ष समितीने केला असल्याची माहिती, महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती, समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) व समितीचे सर्व पदाधिकारी यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

बांधकाम कामगारांकडून भांडी वाटप करताना १००० ते १५०० रुपये घेत असल्याची तक्रार, बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्यक्ष पाहणीसाठी हिरज येथील भांडीवाटप गोडाऊन येथे समितीचे पदाधिकारी गेले असता, ठेकेदाराचे प्रतिनिधी संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपशब्द व शिवीगाळ करून, अंगावर धावून आले. याचा निषेध म्हणून शुक्रवारी (25 जुलै ) रोजी संघर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला.

याविषयी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी सोमवारी त्यांच्या दालनात ठेकेदार व कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक बोलाविली. त्या बैठकीत संघर्ष समितीच्या वतीने संघटनेच्या लोकांना अपमानित करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. तर ठेकेदार शंतनू शेटे व बिराजदार यांनी वरील प्रकाराबाबत आमचा काहीही संबंध नाही., अशी बाजू मांडल्याने संघर्ष समितीने गुरुवारी (31 जुलै) रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा निर्धार जाहीर केला.

सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भांडी वाटप ठेकेदार शंतनू शेठे, बिराजदार बांधकाम कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज), उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोड्डू यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---