गाजराची पुंगी!

तरुण भारत लाईव्ह Maharashtra Politics इसापनीतीमधील, जंगलात राहणा-या कुठल्याशा प्राण्याची एक गोष्ट प्रत्येकानेच कधीतरी वाचली किंवा ऐकलेली असेल. हे प्राणी कळपाने राहतात, माणसाप्रमाणेच त्यांचीही कुटुंबव्यवस्था असते आणि कुटुंबाच्या प्रमुखावर कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारी असते. Maharashtra Politics जंगलातील असंख्य गैरसोयींचा, संकटांचा सामना करत कुटुंबाचा सांभाळ करायचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असते. त्याखेरीज, नैसर्गिक संकटांचे सावटही आसपास दाटलेले असते. Maharashtra Politics उन्हाळा, हिवाळ्याचे दिवस कसेतरी निघून जातात, पण पावसाळ्यात या कुटुंबांचे हाल होतात. निवारा नसल्याने मुलेबाळे भयभीत होतात आणि त्यांची जपणूक कशी करायची याची काळजी या प्राण्यांच्या कुटुंबप्रमुखांना छळू लागते. Maharashtra Politics मग सगळे एकत्र येतात, काहीतरी करून हे संकट निवारायलाच हवे, यावर एकमत होते आणि बुजुर्ग प्राणी डोके खाजवत सल्ला देतात.
Maharashtra Politics माणसासारखं घर बांधलं पाहिजे. डोक्यावर छप्पर असेल तर आपण पावसाळाच नव्हे, तर सगळ्याच ऋतूंमध्ये सुरक्षित राहू, म्हणून घर बांधायचं, असं ठरतं. मग घरबांधणीवर विचारविनियम सुरू होतो. पुढाकार कोण घेणार यावर चर्चा होते, घराची रचना कशी असावी यावर खल होतो. पण माणसाप्रमाणेच, त्या प्राण्यांमध्येही लगेच एकमत होतच नाही. कुणाला जबाबदारी नको असते, तर जबाबदारी घेण्यास तयार असलेल्याविषयी कुणाचा आक्षेप असतो. घर कसे असावे याविषयी काहींच्या मनात शंका असते, तर आपले घर स्वतंत्र ठेवून एकत्र राहता येईल का, या मुद्यावर मतभेद होऊ लागतात. Maharashtra Politics अशा विचारविनिमयांत, मतभेदांत आणि कुरापतींमध्ये एक पावसाळा संपून जातो. पुढचे ऋतू बरे जातात आणि पुन्हा पावसाळ्याचे वेध लागतात. तेच संकट पुन्हा येऊ घातल्याची जाणीव झाली की पुन्हा घर बांधायचा, एकत्र यायचा विचार बळावू लागतो आणि आधीच्या वर्षीच्या चर्चेची पुनरावृत्ती होऊन पुन्हा घरबांधणीचा प्रकल्प आकाराला येतच नाही. दरवर्षी घर बांधण्याचा विचार करणा-या या प्राण्यांच्या कित्येक पिढ्या अखेर पावसाचे संकट झेलतच मोठ्या झाल्या आणि घरबांधणीचा विचार करत म्हाता-याही झाल्या. Maharashtra Politics घर काही होत नाही आणि एकत्र राहण्याच्या कल्पनेला काही मुहूर्त लागत नाही…!
  ही काही कोणा राजकीय पक्षाची कहाणी नाही. Maharashtra Politics जंगलातल्या त्या प्राण्याचीच ही कथा असली, तरी ती वाचताना किंवा ऐकताना, काही प्रसंग, काही पात्रे आणि काही संदर्भ उगीचच नजरेसमोर येऊ लागतात आणि माणसाच्या जगातील काही घटनांशी या कथेचे धागेदोरे जुळत असल्याची जाणीवही होऊ लागते. थोडा विचार केला, तर सध्याच्या राष्ट्रीय किंवा महाराष्ट्रीय राजकारणातील स्थितीशी या गोष्टीचे बरेच साम्य जाणवते. पण अशा कथांच्या शेवटी किंवा सुरुवातीस असहमतिदर्शन नोंद नसते. या गोष्टीतील पात्रे, प्रसंग आणि काळ या काल्पनिक बाबी असून त्याचा कोणत्याही वास्तवाशी संबंध नाही. Maharashtra Politics तसा तो आढळलाच, तर तो योगायोग समजावा, अशी तळटीप देऊन वास्तवाशी थेट संबंध असलेल्या कथा काल्पनिक म्हणून खपविण्याची कला इसापाच्या काळात नव्हती. त्यामुळेच कदाचित त्याच्या कथा कालातीत ठरल्या आणि कोणत्याही काळातील वास्तवाशी त्याचा थेट संबंध जोडणे शक्य होत राहिले. म्हणूनच, इसापनीतीतील या कथेचे राजकारणाच्या सद्य:स्थितीशी साम्य आढळते. महाराष्ट्रात आणि देशात अशीच एक परिस्थिती अधूनमधून दिसते. Maharashtra Politics जंगलातल्या त्या प्राण्यांना, पावसाळा तोंडावर आला की घर बांधण्याचा विचार बळावतो, तसेच देशातील विरोधी पक्षांना निवडणुकीचा हंगाम समोर दिसू लागला की, एकत्र येण्याचे वेध लागतात.
Maharashtra Politics सारे एकत्र येतात, विचारविनिमय करू लागतात आणि गंभीरपणे एक निष्कर्ष काढतात. या निवडणुकीआधी आपण संघटितपणे सत्ताधारी भाजपाचा मुकाबला करायला हवा. समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे असेही ठरते. त्यावर एकमत झाल्याचे भासविण्यासाठी सर्व नेते हातात हात गुंफून हात उंचावलेली छायाचित्रे समाजमाध्यमे किंवा मुख्य माध्यमांवर झळकवितात आणि जनतेने काही गंभीर दखल घेण्याआधीच या चर्चेचे वारे विरून देखील जातात. पुन्हा नव्या निवडणुकीची चाहूल लागेपर्यंत एकत्र येण्याचा मुद्दा थंड पडून जातो आणि नव्या निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती होते. पण एकमत झाले तरी मतभेदाचे मुद्दे कायमच असतात. कोणास नेतृत्वाच्या मुद्यावर सहमती नसते, तर काहींना नव्या घरातील मोठा वाटा हवा असतो. Maharashtra Politics कोणी लहान कोण आणि मोठे कोण या मुद्याचा अगोदर निकाल लावावा यासाठी अडून बसतो, तर कोणास आणखी काही हवे असते. अखेर एकत्र येण्याच्या मुद्याची त्या घर बांधणा-या प्राण्यांच्या कथेसारखी अवस्था होते. तरीही काही जण आपापले घर तरी मजबूत करावे यासाठी कामाला लागलेले दिसतात. देशात भाजपाविरोधी संयुक्त पुरोगामी आघाडी नावाची एक विरोधी पक्षांची मोट अगोदरपासून अस्तित्वात आहे, पण गेल्या काही निवडणुकांत या ऐक्यातून सत्तेची गणिते फारशी साधलेली नाहीत.
शिवाय, सततच्या निवडणुकांत पराभव पाहणा-या काँग्रेसकडे असलेले या आघाडीचे नेतृत्व काहींना मान्य नाही. पराभूत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अन्य पक्षांतील बुजुर्ग नेत्यांना मार्गदर्शन करावे याची अनेकांना खंत वाटते आणि अशाच मुद्यांवरून संपुआ नावाची गोष्ट पुढे सरकेनाशीच होते. Maharashtra Politics त्यामुळेच, आता एकत्र येण्याच्या त्या गोष्टीचा औपचारिकपणादेखील संपला असला, तरी सत्ताधारी भाजपाशी मुकाबला करणे हे कोणा एकाच पक्षाच्या कुवतीबाहेरचे आहे, याची प्रत्येक पक्षास जाणीव असल्याने, आपापल्या गटाची मोट बांधण्याचे प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून सुरूच असतात. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेची संधी साधण्यासाठी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचेही तेच झाले आहे. Maharashtra Politics मुळातच अनैसर्गिक अपरिहार्यतेमुळे सत्तासंपादनाचा मागच्या दाराचा मार्ग म्हणून महाविकास आघाडी स्थापन करून भाजपा आणि शिवसेनेची युती संपुष्टात आणल्यास राज्यातील मोठी राजकीय शक्ती खिळखिळी करण्याचा आणि त्याबरोबरच सत्तेची गणितेही जुळविण्याचा डाव शरद पवारांनी नेमका साधला. Maharashtra Politics महाविकास आघाडी हा शिवसेनेला भाजपापासून अलग करण्याचा डाव होता, हे आता स्पष्ट झाले आहे.
राज्यात शिवसेना स्वबळावर कधीच सत्ता संपादन करू शकणार नाही, पण ती भाजपासोबत राहिल्यास अन्य कोणत्याच पक्षास सत्ता मिळविणे सोपे राहणार नाही, हे शरद पवार यांनी नेमके हेरले. Maharashtra Politics साहजिकच, प्रादेशिक पक्षांची ताकद खच्ची केल्याखेरीज किंवा प्रादेशिक पक्षांना काखोटीस मारल्याखेरीज महाराष्ट्राच्या राजकारणात आपले पाय रोवता येणार नाही, हेही शरद पवारांना माहीत होते. काँग्रेससोबतचा राष्ट्रवादी काँग्रेसचा घरोबा ही नैसर्गिक आणि समविचारी राजकीय युती असल्याचे म्हटले जात असले, तरी शरद पवार या युतीबाबत समाधानी नाहीत, हेही वारंवार स्पष्ट झाले आहे. Maharashtra Politics एखाद्या वृक्षाचा आधार घेऊन कमकुवत वेलीने फोफावत वाढावे आणि झाडाला विळखा घालून त्याच्याच जीवनरसावर स्वत:चे पोषण करून घेत राहावे, हा निसर्गात आढळणारा प्रकार राजकारणातही दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची युती हा त्या निसर्गनियमाचाच राजकीय आविष्कार आहे. Maharashtra Politics त्यामुळे, शिवसेनेस भाजपापासून अलग केल्यानंतर ही ताकद राष्ट्रवादीच्या दावणीस बांधून शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्तेची गणिते जमवून आणली, पण त्यासाठी स्थापन केलेल्या महाविकास आघाडी नावाच्या गाजराच्या पुंगीचा ताजेपणा संपण्याआधीच तिची वासलात लागली.
Maharashtra Politics अनैसर्गिक अशा या आघाडीची सत्ता जेमतेम अडीत वर्षांत संपुष्टात आलीच, पण त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय शक्ती असलेल्या शिवसेनेस मात्र मोठी पडझड पाहावी लागली आहे. राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रातील अस्तित्व टिकविण्याची धडपड आता उद्धव ठाकरे यांना करावी लागत आहे. या महाविकास आघाडीच्या अट्टहासापायीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पक्षातच असंतोष पसरल्याने पडलेली मोठी फूट आता अस्तित्वावरच प्रश्नचिन्हे उमटवू लागल्याने, हाताशी मिळेल त्या पक्षास, संघटनेस सोबत घेण्याची धडपड ठाकरे यांनी सुरू केली आहे. Maharashtra Politics शिवसेनेस सत्तेपर्यंत नेण्यासाठी काही राजकीय आणि बहुसंख्य जनतेच्या अस्मितेस हात घालेल असा विचार देण्याची गरज शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना उशिराच लक्षात आली आणि त्यासाठी भाजपासोबत युती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसे पाहता, हिंदुत्व हा विचाराचा मुद्दा नाही. तो आचरणाचा मुद्दा आहे, हे संघासारख्या काही संघटना वारंवार सांगत असतात. Maharashtra Politics हिंदू ही एक जीवनशैली आहे आणि भारताच्या संस्कृतीशी तिचे निकटचे नाते असल्याने, या जीवनशैलीशी एकरूप झालेला प्रत्येक भारतवासी हा हिंदूच आहे, अशी धारणा जेव्हा मांडली जाते, तेव्हा qहदुत्व हा केवळ विचार नाही, तर आचारशैली आहे हे स्पष्ट होते.
बाळासाहेबांच्या शिवसेनेने हिंदुत्व हा राजकीय विचार म्हणून स्वीकारला आणि सत्तेच्या राजकारणात प्रवेश केला. भाजपाच्या हिंदुत्वाचा विचार या देशाच्या जीवनशैलीशी नाते सांगणारा आहे, तर शिवसेनेचे हिंदुत्व केवळ भगव्या रंगाशी नाते जोडणारे आहे. Maharashtra Politics सत्तेचा भगवा फडकविण्याचे स्वप्न असलेल्या शिवसेनेस सत्तेची संधी मिळताच, हा विचारदेखील खुंटीवर टांगून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. आता याच कारणामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्या काखोटीस उरलेल्या पक्षाकडे विचारांचाच संभ्रम फैलावला आहे. कदाचित त्यामुळेच, कम्युनिस्टांपासून संभाजी ब्रिगेडपर्यंत कोणाचाही राजकीय आधार घेण्याची गरज उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभी ठाकली आहे. Maharashtra Politics महापालिकांच्या आगामी निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेस भगवा खांद्यावर घेऊन अभिमानाने उतरता येणार नाही, अशी वेळ या आघाडीच्या प्रयोगामुळे ठाकरे यांच्या गटावर ओढवली आहे. Maharashtra Politics अशा स्थितीत, आता ठाकरे गटाचा मुकाबला शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत तर आहेच, पण भक्कम जनाधार असलेल्या भाजपासोबतही आहे. साहजिकच, आता ठाकरे गटासही विरोधी ऐक्याची गरज भासू लागली असताना, नेमक्या याच वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपापल्या घराची डागडुजी करण्यास प्राधान्य देत आहेत.
Maharashtra Politics तिकडे राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेमुळे काँग्रेसच्या स्वबळाच्या आशा उंचावत चालल्या असल्या तरी, राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत कलहाने ग्रासल्याचे दिसू लागले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेली मवाळ भूमिका, त्याआधी राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार यांना भाषणाची संधी न मिळाल्याने उघड झालेली नाराजी आणि आता, छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख करण्यावरून शरद पवार व अजित पवार यांच्यात सुरू झालेला वैचारिक संघर्ष पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार काही चांगले वातावरण नाही, असेच दिसू लागले आहे. Maharashtra Politics शरद पवार यांची राजकीय भूमिका नेहमीच संधीतून सोने शोधण्याची असते, हे महाराष्ट्रास माहीत आहे. त्यामुळेच, त्यांच्या भूमिकेविषयी कोणासच काही खात्रीपूर्वक अनुमान बांधता येत नसल्याने, ठाकरे यांच्यासोबत शिल्लक राहिलेल्या शिवसेनेस राष्ट्रवादीकडून किती पाठबळ मिळेल हेही आता अनिश्चितच आहे. साहजिकच, अडीच-तीन वर्षांच्या या खेळात ठाकरे यांच्या शिवसेनेस मोठा फटका बसला असून ठाकरे गटाची शिवसेना एकाकी झाली आहे. सत्तेच्या संधीसाठी शरद पवारांनी बांधलेल्या आघाडीची गाजराची पुंगी वाजेनाशी झाली आहे. Maharashtra Politics आता ती मोडून टाकली, तर पवारांच्या पक्षास फारसा फरक पडेल असे नाही, पण ठाकरे गटाची मात्र मोठीच पंचाईत होणार आहे.
आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबत युती करण्याची पावले टाकून ठाकरे गट आपलीच ताकद अधिकच क्षीण करून घेणार असे दिसू लागले आहे. Maharashtra Politics आता ठाकरे यांच्या पक्षास महाविकास आघाडी नावाच्या अस्तित्वहीन राजकीय तडजोडीसोबत राहावे लागणार आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीतील जागावाटपातून शिवसेनेच्या वाट्याला येणा-या जागांपैकी काही जागा प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासाठी सोडाव्या लागतील असे दिसते. तसे झाल्यास, अगोदरच शक्तिहीन झालेल्या ठाकरे गटाची ताकद अधिकच क्षीण होण्याचीच शक्यता आहे. Maharashtra Politics त्यामुळे आंबेडकरांच्या पक्षासोबतची युती ठाकरे गटाची ताकद वाढविणारी न ठरता, ठाकरे गटाच्या ताकदीवर आंबेडकरांच्या पक्षाला फायदा मिळवून देणारी ठरेल, अशीच चिन्हे आहेत. शरद पवार यांनी चाणाक्षपणे बांधलेल्या आघाडीची गाजराची पुंगी आता वाजणार तर नाहीच पण न वाजणारी गाजरे मोडून खाण्याच्याही योग्यतेची राहिलेली नाहीत. Maharashtra Politics ठाकरे यांच्यासमोर सत्तेचे आणि मुख्यमंत्रिपदाचे जे गाजर पवार यांनी दाखविले, ते गाजर म्हणजेच पुंगी होती. अडीच वर्षे ती वाजली आणि अचानक तिचा सूर संपला. ती मोडून खाण्यापुरतीदेखील राहिलेली नाही, हे लक्षात येण्यासही आता उशीरच झाला आहे.