---Advertisement---
जळगाव : तुझ्या नक्याला फारकत देऊन माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणत एका तरुणाने महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ढाकेवाडी परिसरात ३ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली २५ वर्षीय महिला ३ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजता ढाकेवाडीतून जात होती. यावेळी आकाश सुरेश जोशी (रा. नाथवाडा) आणि अनुप प्रमोद जोशी (रा. जोशी कॉलनी) या दोन तरुणांनी तिला अडवले. यावेळी आकाश जोशी याने महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तू तुझ्या नक्ऱ्याला फारकत दे आणि माझ्यासोबत लग्न कर, अशी त्याने मागणी केली. महिलेने त्याला नकार दिला असता, त्याने तिला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अनुप जोशी यानेही महिलेला शिवीगाळ केली आणि तू आकाशसोबत लग्न कर, नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली.
या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकाश सुरेश जोशी आणि अनुप प्रमोद जोशी या दोघांविरुद्ध विनयभंग करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









