सीबीएसई दहावीसाठी पाच ऐवजी दहा पेपर

नवी दिल्ली : १ फेब्रुवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक संरचनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सीबीएसई बोर्डाच्या प्रस्तावानुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच ऐवजी दहा विषयांचे पेपर द्यावे लागणार आहेत. त्यांना शैक्षणिक सत्रात दोन ऐवजी तीन भाषांचा अभ्यास लागणार आहे.यात दोन भारतीय भाषांचा समावेश असेल.

इतर सात विषय असतील. त्याचप्रमाणे इयत्ता बारावीमध्ये विद्यार्थ्यांना एका ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल, ज्यात एक भारतीय भाषा बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांना सहा विषयांत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. सध्या सीबीएसईच्या दहावी आणि बारावीमध्ये प्रत्येकी पाच विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे लागते.प्रस्तावित बदल हे शालेय शिक्षणात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लागू करण्याच्या सीबीएसईच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. ‘क्रेडेन्शिअलायझेशन’ या बदलाचा उद्देश व्यावसायिक आणि सामान्य शिक्षणात शैक्षणिक समानता आणणे हा आहे;

जेणेकरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे दोन्ही शिक्षण प्रणालींना महत्त्व मिळू शकेल.शिक्षणाचे सुमारे १२०० तास शालेय अभ्यासक्रमात औपचारिक क्रेडिट सिस्टिम नाही. सीबीएसईच्या योजनेनुसार, एका शैक्षणिक वर्षात शिकण्याचे १२०० तास असतील. हे तुम्हाला ४० क्रेडिट देईल. काल्पनिक शिकवणीचा अर्थ हा त्या निश्चित वेळेशी आहे, जो एका सरासरी विद्यार्थ्याला आवश्यक निकाल मिळविण्यासाठी लागतो. म्हणजेच, प्रत्येक विषयाला ठराविक तास दिले जातात. एका वर्षात एका विद्याथ्यनि त्यात यशस्वी होण्यासाठी एकूण १२०० शिक्षण तास घालवले पाहिजेत. या तासांमध्ये शाळेतील शैक्षणिक शिक्षण आणि शाळेबाहेरील गैर- शैक्षणिक किंवा अनुभवात्मक शिक्षण या दोन्हींचा समावेश असेल.