तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२२ । सीबीएसईच्या दहावी आणि बारावी च्या परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. बोर्डाने काल परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसात नवीन वर्षाचे आगमन होत असून यासाठी सर्वांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीला सुरूवात करावी लागणार आहे.
बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर जाऊन तारीख पत्रकाची PDF डाउनलोड करू शकतात. करोना काळात गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. “12वीची तारीखपत्रक तयार करताना, जेईई (मुख्य) सह स्पर्धात्मक परीक्षांचा विचार केला गेला आहे.” असे सीबीएसईने म्हटले आहे.
असे डाऊनलोड करा परीक्षेचे वेळापत्रक-
वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in य संकेतस्थळाला भेट द्यावी.
दहावी, बारावी परीक्षा शेड्युल 2023 वर क्लिक करावे.
त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या दोन वेगवेगळ्या पीडीएफ तुम्हाला स्क्रिनवर दिसतील.
दहावी, बारावी परीक्षेची डेटशीट डाऊनलोड करावी.