---Advertisement---
जळगाव : ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावात त्यांच्या घरासमोर फटाके फोडून, पेढे वाटून आणि ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. यावेळी निकम कुटुंबातील रोहित निकम, शैलेजा निकम, रितेश निकम यांनी एकमेकांना पेढे भरवले. आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.
लोकसभेच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर आता राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून झालेली निवड ही अॅड. निकम यांच्या कार्याचा योग्य गौरव असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
यावेळी निकम कुटुंबातील रोहित निकम, शैलेजा निकम, रितेश निकम यांनी एकमेकांना पेढे भरवले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.
उज्ज्वल निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकीलांपैकी एक मानले जातात. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यासह अनेक हाय-प्रोफाइल फौजदारी खटल्यांमध्ये त्यांनी विशेष सरकारी वकीलाची भूमिका बजावली आहे.
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना भाजपने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. परंतु आता या नियुक्तीमुळे त्यांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.