---Advertisement---

दिल्लीतील अभूतपूर्व विजयाचा पाचोर्‍यात जल्लोष, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला ‘आनंदोत्सव’

---Advertisement---

पाचोरा (विजय बाविस्कर) : दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय संपादन केला. विशेषतः तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभरात केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, पाचोरा यांच्या वतीने विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

तालुकाध्यक्ष तथा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील अटल भाजपा कार्यालयात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष व्यक्त केला. तसेच “भारत माता की जय”, “मोदी, मोदी” अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ

कार्यकर्त्यांचा जोश आणि जल्लोष!

या विजयी सोहळ्यात भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका सरचिटणीस तथा माजी सभापती बन्सीलाल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बापू पाटील, भाजपा शहराध्यक्ष दीपक माने, भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख संजू दादा पाटील, सरचिटणीस समाधान मुळे, जगदीश पाटील, गिरीश बर्वे, अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष रहीम बागवान, शहराध्यक्ष टिपू देशमुख, प्रदीप पाटील, रोहन मिश्रा, सोहम मोरे आदी प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून दिल्लीतील विजयाने पक्षाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. आगामी काळात या विजयाचा प्रभाव देशभरातील निवडणुकांवरही पडेल, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment