केंद्र सरकारने देशातील VIPव्यक्तींच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशातील व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजी कमांडोऐवजी आत्ता VIPव्यक्तींच्या सुरक्षतेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांकडे असेल. पुढील महिन्यापासून हा आदेश लागू होणार आहे. एनएसजी कमांडोचा वापर आता केवळ दहशतवादविरोधी कारवायांसाठी केला जाईल.
देशात सध्या 9 व्हीआयपींना झेड-प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेसाठी एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो तैनात आहेत. आता त्यांच्या जागी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. संसदेच्या सुरक्षेपासून मुक्त झालेल्या सीआरपीएफ जवानांना विशेष प्रशिक्षण देऊन व्हीआयपी सुरक्षा शाखेत पाठवण्यात येणार असून यासाठी नवीन बटालियनही तयार करण्यात आली आहे.
या व्हीआयपींना झेड प्लस सुरक्षा मिळते
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा सुप्रीमो मायावती, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, सर्बानंद सोनोवाल, रमण सिंह, गुलाब नबी आझाद, फारूक अब्दुल्ला, चंद्राबाबू नायडू यांना झेड प्लस सुरक्षा आणि एनएसजी सुरक्षा मिळाली आहे.
NSG कमांडोच्या सुरक्षेत असलेल्या 9 VIP पैकी योगी आदित्यनाथ आणि राजनाथ यांना Advanced Security License (ASL) प्रोटोकॉल मिळाला आहे. या अंतर्गत व्हीआयपी कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यापूर्वी त्या ठिकाणाची देखरेख आणि सुरक्षा तपासणी केली जाते. या दोन व्हीआयपींसाठी हे काम एनएसजी कमांडो मार्फत केले जाते. पण आता ती जबाबदारी सीआरपीएफने कडे जाणार आहे.सीआरपीएफने यापूर्वी गृहमंत्री अमित शहा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सदस्यांसाठी एएसएल प्रोटोकॉलचे पालन केले होते.