DA hike: केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर गोड बातमी दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात केंद्र सरकाने वाढ केली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3% वाढ मंजूर करण्यात आली. मोदी सरकारने दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ जाहीर केली. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. सध्या डीए 50% आहे, 3% वाढल्यानंतर 53% इतका झाला आहे.
केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते. ज्याची अंमलबजावणी जानेवारी आणि जुलैपासून केली जाते. या वर्षी जुलैमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्यात बराच विलंब झाल्यामुळे दिवाळीच्या काही दिवस आधी ही वाढ जाहीर करण्यात आली.यावेळी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारात मोठी वाढ मिळणार आहे. कारण 1 जुलै 2024 पासून महागाई भत्ता लागू केला जाईल. यामुळे महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हीसाठी पात्र असलेल्यांना जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वाढीव थकबाकी मिळेल.
देशातील सुमारे एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सुमारे 49 लाख कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत म्हणजे डीए आणि डीआरमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आहे.