खुशखबर ! नाताळ, नववर्षासाठी जळगाव, भुसावळमार्गे धावणार ‘या’ नवीन रेल्वे गाड्या

#image_title

तरुण भारत लाईव्ह । २२ डिसेंबर २०२४ । नाताळ आणि नववर्ष दिन साजरा करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन  मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

नाशिक-धनबाद गरीबरथ विशेष आणि रिवा-मडगाव विशेष गाड्या जळगाव व भुसावळ स्थानकांवर थांबणार आहेत, ज्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक सोय उपलब्ध होईल.

नाशिक-धनबाद गरीबरथ विशेष:
गाडी क्र. 03398

प्रवासाचे दिवस: 22 डिसेंबर ते 2 जानेवारी, प्रत्येक गुरुवार व रविवार
वेळ: नाशिक येथून रात्री 8:55 वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी धनबाद येथे रात्री 9 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 03397

प्रवासाचे दिवस: 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर, प्रत्येक मंगळवार व शुक्रवार
वेळ: धनबाद येथून रात्री 11 वाजता सुटेल, तिसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता नाशिक येथे पोहोचेल.
रिवा-मडगाव विशेष:
गाडी क्र. 01703

प्रवासाचे दिवस: 22 डिसेंबर आणि 29 डिसेंबर
वेळ: रिवा येथून दुपारी 12 वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्र. 01704

प्रवासाचे दिवस: 23 डिसेंबर आणि 30 डिसेंबर
वेळ: मडगाव येथून रात्री 10:30 वाजता सुटेल.