जळगाव : मध्य रेल्वे मार्गावर जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसर्या आणि चौथ्या लोहमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. भुसावळ आणि जळगाव दरम्यान चौथ्या लोहमार्गाचे जळगाव यार्ड रीमॉडेलिंगमध्ये प्री-एनआय आणि एनआय कामे केली जाणार आहेत. त्यासाठी 3 ते 6 डिसेंबर दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात असून मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील सुमारे 38 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 18 मेल एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला असल्याचे भुसावळ मध्य रेल्वे विभाग अधिकार्यांनी म्हटले आहे.
तिसर्या आणि चौथ्या लोहमार्गाच्या कामासाठी घेण्यात येणार्या ब्लॉकमुळे नागपूरहून मुंबई, पुणे आणि नागपूरकडे जाणार्या मेल एक्सप्रेस गाड्या 3 ते 6 डिसेंबर दरम्यान तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे, मुंबई, अहमदाबाद, गोवाचा प्रवास करणार्यांची अडचण होणार आहे.
मार्ग बदलेल्या मेल एक्सप्रेस
बिलासपूर-हापा, हावडा-अहमदाबाद, एमजी रामचंद्रन-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, पुरी-ओखा द्वारका एक्सप्रेस, पुरी-सुरत, पुरी-गांधीधाम, संत्रागाछी-पोरबंदर कवी गुरु एक्सप्रेस 4 आणि 5 डिसेंबरला बडनेरा जंक्शन-भुसावळ चोरड- खांडवा-इटारसी जंक्शन- भोपाळ जं- रतलाम जंक्शन-छायापुरी मार्गे वळण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या ब्लॉकदरम्यान प्रवाशांसाठी बससेवा
मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवसांच्या ब्लॉकदरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ तसेच जळगाव मधून देखील लांबपल्ल्याच्या वाढीव बसेस चालविल्या जातील. यात नाशिक, अकोला, सूरत, बर्हाणपूर या मार्गावर जादा तसेच लोहमार्गाला जोडलेल्या गाव-शहराला जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यास जादा विशेष गाड्या सोडल्या जातील, असे एसटी परिवहन प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रद्द असलेल्या गाड्या
3- ते 6 डिसेंबर दरम्यान- 01139-01140 नागपूर -मडगाव, 12113-12114 नागपूर-पुणे, 22137-22138 नागपूर-अहमदाबाद, 12105-12106 सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, 12135-12136 नागपूर-पुणे एक्स्प्रेस, 12139-12140 नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम, 11039-11040 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस तसेच भुसावळ-बांद्रा, अमरावती-मुंबई, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे हुतात्मा, भुसावळ-देवळाली शटल, देवळाली-भुसावळ शटल, भुसावळ-सुरत, भुसावळ-कटनी पॅसेंजर, रद्द करण्यात आल्या आहेत.