---Advertisement---

खुशखबर ! होळीनिमित्त मध्य रेल्वे २८ विशेष गाड्या धावणार, पहा यादी

by team
---Advertisement---

होळी हा रंगांचा आणि उत्साहाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई आणि पुण्यातील हजारो चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी निघतात. या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर, मुंबई-मडगाव, मुंबई-नांदेड आणि पुणे-नागपूर मार्गावर एकूण २८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रवास अधिक सुकर करण्यासाठी या गाड्यांना ठराविक प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या विशेष गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि बुकिंगची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे आहे:

मुंबई – नागपूर – मुंबई द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा)
ट्रेन क्रमांक 02139 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर

प्रवासाची दिनांक: ९, ११, १६, आणि १८ मार्च (रविवार आणि मंगळवार)
निघण्याची वेळ: ००.२० AM (मध्यरात्री)
पोहोचण्याची वेळ: १५.१० PM (दुपारी)
ट्रेन क्रमांक 02140 – नागपूर ते CSMT

प्रवासाची दिनांक: ९, ११, १६, आणि १८ मार्च (रविवार आणि मंगळवार)
निघण्याची वेळ: रात्री ८.०० PM
पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० PM
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – LTT साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01129 – LTT ते मडगाव

प्रवासाची दिनांक: १३ आणि २० मार्च (गुरुवार)
निघण्याची वेळ: २२.१५ PM
पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी १०.३० AM
ट्रेन क्रमांक 01130 – मडगाव ते LTT

प्रवासाची दिनांक: १४ आणि २१ मार्च (शुक्रवार)
निघण्याची वेळ: १४.३० PM
पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी ०४.०५ AM
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड

पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01469 – पुणे ते नागपूर

प्रवासाची दिनांक: ११ आणि १८ मार्च (मंगळवार)
निघण्याची वेळ: १५.५० PM
पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी ०६.३० AM
ट्रेन क्रमांक 01470 – नागपूर ते पुणे

प्रवासाची दिनांक: १२ आणि १९ मार्च (बुधवार)
निघण्याची वेळ: ०८.०० AM
पोहोचण्याची वेळ: २३.३० PM
थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

मुंबई – मडगाव – मुंबई साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 01151 – CSMT ते मडगाव

प्रवासाची दिनांक: ६ आणि १३ मार्च (गुरुवार)
निघण्याची वेळ: ००.२० AM
पोहोचण्याची वेळ: १३.३० PM (दुपारी)
ट्रेन क्रमांक 01152 – मडगाव ते CSMT

प्रवासाची दिनांक: ६ आणि १३ मार्च (गुरुवार)
निघण्याची वेळ: १४.१५ PM
पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी ०३.४५ AM
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी


लोकमान्य टिळक टर्मिनस – नांदेड – LTT साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 01105 – LTT ते नांदेड

प्रवासाची दिनांक: १२ आणि १९ मार्च (बुधवार)
निघण्याची वेळ: ००.५५ AM
पोहोचण्याची वेळ: २१.०० PM (रात्री)
ट्रेन क्रमांक 01106 – नांदेड ते LTT

प्रवासाची दिनांक: १२ आणि १९ मार्च (बुधवार)
निघण्याची वेळ: २२.३० PM
पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी १६.०५ PM
थांबे: ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, बारसी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा

या विशेष ट्रेनचे बुकिंग: २४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू
अधिक माहिती रेल्वेचे च्या संकेत स्थळाला भेट द्या

मध्य रेल्वेने चाकरमान्यांच्या सोयीसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment