---Advertisement---
पंढरपूर येथे आषाढी वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर १ ते १० जुलै दरम्यान यात्रेकरूंना सोयीसाठी मध्य रेल्वेकडून आषाढी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
नागपूर-मीरज विशेष गाड्या (४ फेऱ्या) गाडी क्र. ०१२०५ विशेष गाडी ४ व ५ जुलै रोजी नागपूर येथून ८.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मीरज येथे पोहोचेल. विशेष गाडी क्र. ०१२०६ ५ व ६ जुलै रोजी मीरज येथून १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.
थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जाठ रोड, ढाळगाव, कवठे महांकाळ सालगरे, आरग.
या गाडीची रचना पुढीलप्रमाणे
आहे २ एसी-३ टियर, १० स्लीपर, ४ सामान्य द्वितीय श्रेणी व २ दुसऱ्या श्रेणीच्या सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन्स २. न्यू अमरावती पंढरपूर विशेष गाड्या (४ फेऱ्या) विशेष गाडी क्र. ०१११९ २ व ५ जुलै रोजी न्यू अमरावती येथून १४.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ९.१० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. ०११२० विशेष ३ जुलै व ६ जुलै रोजी पंढरपूर येथून १९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता न्यू अमरावती येथे पोहोचेल.
थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी. गाडीची रचना : २ एसी-३ टियर, १० स्लीपर, ४ सामान्य द्वितीय श्रेणी व २ दुसऱ्या श्रेणीच्या सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन्स.
खामगाव-पंढरपूर विशेष गाड्या (४ फेऱ्याा) विशेष गाडी क्र. ०११२१ ३ व ६ जुलै रोजी खामगाव येथून ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. विशेष गाडी क्र. ०११२२ ४ व ७जुलै रोजी पंढरपूर येथून ५ वाजता सुटून १९.३० वाजता खामगाव येथे सुटून पोहोचेल.
थांबे : जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी, रचना : २ एसी-३ टियर, १० स्लीपर, ४ सामान्य द्वितीय श्रेणी व २ दुसऱ्या श्रेणीच्या सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन्स.
भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (२ फेन्या) विशेष गाडी क्र. ०११५९ अनारक्षित ५ जुलै रोजी भुसावळ येथून १३.३० वाजता सुटून दुसन्या दिवशी ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. विशेष गाडी क्र. ०११६० अनारक्षित ६ रोजी पंढरपूर येथून २२.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १३ वाजता भुसावळ येथे पोहोचेल.
थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी, गाडीची रचना : १६ स्लीपर डबे व २ दुसऱ्या श्रेणीच्या सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन्स.