महापालिकेच्या एका प्रभाग समिती सभापतीची निवडणूक कार्यक्रम जाहीर

जळगाव : महापालिकेच्या एका प्रभाग समितीमधील सभापती निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्तांकडून मनपास प्राप्त झाला आहे. प्रभाग समिती १ मधील सभापती ची निवडणूक होणार असून यासाठी  २४ रोजी विशेष सभेचे सकाळी ११ वाजता मनपा सभागृहात आयोजन केले आहे.

पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमन मित्तल राहणार आहे. त्यापूर्वी १७ ते १९ एप्रिल दरम्यान नामनिदेर्शऩ अर्ज घेण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नगरसचिव कार्यालयात अर्ज मिळणार आहे. २० रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अर्ज नगरसचिव कार्यालयात स्विकारले जातील. अर्ज छाननी, अर्ज मागे घेणे हे २४ रोजी होणार्‍या सभा सुरू झाल्यावर होणार आहे.