---Advertisement---

Chalisagaon : देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, ७ जण जखमी

---Advertisement---

चाळीसगाव । अक्कलकोटहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला चाळीसगाव येथील कन्नड घाटात भीषण अपघात झाला आहे. वाहन थेट दरीत कोसळल्याने या अपघात चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहे. प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय वय ६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५), पूर्वा गणेश देशमुख (वय ८) असं या अपघातातील मृतांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव येथील काहीजण अक्कलकोट दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना कन्नड घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. दाट धुके आणि अंधार यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट दरीत कोसळून हा अपघात झाला.

अपघातात गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीसह दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर सात जण जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment