जळगाव : जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात ट्रक-आयशर यात झाला असून, आयशर चालकाचा जागीच मृत्यू, तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. समाधान पाटील असे मयताचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ आयशर आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघतात आयशर चालक जागीच ठार झाला, तर ट्रक चालकासह तीन जण जखमी झाले आहेत.
अपघातानंतर काही वेळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली.