---Advertisement---

Chalisgaon News : गावात घरफोडी, गावच्याच अट्टल चोरटयांना अटक

by team
---Advertisement---

चाळीसगाव : तालुक्यातील खरजई येथे नोकरदाराकडे मार्च महिन्यात धाडसी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी एक लाख ६८ हजार रुपये किमतीचे दागिने लांबवले होते. चाळीसगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत खरजई गावातीलच आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत १८ हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची चैन काढून दिली आहे. अक्षय गुलाब कडवे (२१) व यश बापू मुलमुले (१९, दोन्ही रा. खरजई) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यातील चोरीची उकल
खरजई गावात अमोल माधवराव म्हसके (३८, ह.मु. शिवाजी नगर, खरजई नाका, चाळीसगाव) यांचे घर असून नोकरीनिमित्त ते चाळीसगावात राहतात. घर बंद असल्याची संधी साधत ७ मार्च २०२५ त्यांच्या बंद घरातून चोरट्यांनी एक लाख ६८ हजार रुपये किमतीचे दागिने लांबवले होते. चाळीसगाव शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. हवालदार प्रशांत पाटील यांना तपासादरम्यान आरोपींची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक राजेशसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत पाटील, अजय पाटील, हरीश पाटील, आशुतोष सोनवणे, कॉन्स्टेबल सभा शेख आदींच्या पथकाने केली



Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment