---Advertisement---

Chalisgaon News : करगाव विकासोच्या चेअरमनपदी योगिता पाटील यांची बिनविरोध निवड

---Advertisement---

Chalisgaon News : चाळीसगाव तालुक्यातील करगांव येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीची आज बुधवार रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी योगिता पाटील यांची चेअरमन तर विठ्ठल चव्हाण यांची व्हाईस चेअरमन म्हणून एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

करगाव येथील विविध कार्यकारी विकास सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी आज बुधवार रोजी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ठरल्याप्रमाणे योगिता आत्माराम पाटील यांची चेअरमन तर विठ्ठल हरी चव्हाण यांची व्हाईस चेअरमन म्हणून एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. याबाबत संचालक मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात येत आहे.

याप्रसंगी संचालक मंडळ माजी चेअरमन दिनकर राठोड, अलिचंद राठोड, अशोक पाटील, सदू पवार, दामू अण्णा पाटील, भाऊलाल चव्हाण, कैलास राठोड, प्रभाकर काळे, छबीबाई गोफणे, मधुकर जाधव , आत्माराम पवार आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment