फुटेजनुसार चाळीसगाव पोलिसांचा तपास, मालेगावातून दुचाकी चोरटे गजाआड

जळगाव : सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारावर चाळीसगाव पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना मालेगाव येथून ताब्यात घेतले. चाळीसगाव येथे चोरीस गेलेल्या महागड्या दोन दुचाकी संशयितांकडून पोलिसांनी हस्तगत केल्या. उमर फारुख कलीम अहमद (वय २०) तसेच मोहम्मद शोएब मोहम्मद ईलियास (वय २३, रा. दोघे गौसे आझमनगर, मालेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. मुबशीर खान मेहमुद खान (वय २७, रा. छाजेड ऑईल मिल परिसर, चाळीसगाव) यांच्या मालकीची ६५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्रमांक एमएच १९ ईसी ०५८२) ही शुक्रवार, १३ रोजी रात्री घरासमोरुन चोरट्यांनी चोरुन नेली होती. या प्रकरणी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन ते तपासले. या फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने मालेगावला जाऊन तपासाचे चक्रे फिरविले. चौकशीतून दुचाकी चोरीची कबुली संशयितांनी दिली. सुमारे १ लाख ३५ हजार किमतीच्या दोन दुचाकी पथकाने हस्तगत केल्या. दुसरी दुचाकी ठाणे शांतीनगर येथुन दुचाकी चोरत्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात शोध पथकातील पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकों विजय पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटील, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रवींद्र बच्छे, पोकॉ पवन पाटील, पोकॉ राकेश महाजन, पोकॉ नरेंद्र चौधरी यांच्या पथकाने केली. तपास पोहेकॉ राहुल सोनवणे, पोकॉ ज्ञानेन्वर पाटोळे हे करीत आहेत.