---Advertisement---

Champions Trophy 2025 : कर्णधार मोहम्मद रिझवानवर बंदीची टांगती तलवार; नेमकं काय घडलं?

---Advertisement---

Champions Trophy 2025 : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करू शकला नाही. यामुळे आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पंच रिचर्ड केटलबर्घ, सरफुदौला, तिसरे पंच जोएल विल्सन आणि चौथे पंच अॅलेक्स वार्फ यांनी हा निर्णय घेतला.

हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने आपली चूक मान्य केली आहे. मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यातही जर अशाच प्रकारची चूक झाली, तर रिझवानला बंदीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाकिस्तान संघासाठी हा सामना केवळ स्पर्धेतील टिकावासाठी नव्हे, तर कर्णधाराच्या भवितव्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा : धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एक गर्भवती, दुसरीची प्रसूती

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा सहज पराभव केला. ३२० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ २६० धावांतच गारद झाला आणि न्यूझीलंडने ६० धावांनी विजय मिळवला. त्यातच पाकिस्तानच्या अडचणी वाढवणारी आणखी एक घटना म्हणजे सलामीवीर फखर झमानचा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर होणे. सामना सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात तो क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला आणि आता त्याला संपूर्ण स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

पाकिस्तानसमोर भारताची कडवी लढत

१९९६ नंतर प्रथमच आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तानसमोर आता मोठे आव्हान आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्यावर दबाव वाढला असून, भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी त्यांना जबरदस्त खेळ करावा लागेल. रविवारी दुबईत रंगणाऱ्या या महामुकाबल्याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे. पाकिस्तान संघावरील आयसीसीची कारवाई आणि रिझवानवरील संभाव्य बंदीमुळे हा सामना अधिक रंगतदार ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment