---Advertisement---
जळगावसह राज्यात येणाऱ्या दोन-तीन दिवसांत बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामध्ये कोकण किनारपट्टी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात बसू शकतो. रब्बी पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे वाढलेल्या तापमानात घट होण्याचाही अंदाज व्यक्त केला गेला आहे.
येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपीटची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. नंतर तो येलो अलर्ट असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.