Chandigarh : चंदीगडमध्ये केजरीवालांच्या ३ साथीदारांची भाजपला साथ

Chandigarh :   चंदीगडमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या ३ साथीदारांनी साथ सोडली आहे. भाजपचे महापौर मनोज सोनकर यांनी  राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा निवडणुक होणार आहे. पण, या निवडणुकीच्या आधीच आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला . आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

 

आप नगरसेवक नेहा मुसावत, पूनम आणि गुरचरण काला यांना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पक्षाचे सदस्यत्व बहाल केले. त्यामुळे महापालिकेत आता भाजपचा आकडा वाढला आहे. महापालिकेत भाजपचे आता १८ नगरसेवक आहेत. तर ‘आप’कडे केवळ १० नगरसेवक राहिले आहेत. याशिवाय काँग्रेसचे ७ तर शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) १ नगरसेवक आहे.

 

भाजपचे सदस्यत्व घेतलेले नगरसेवक गुरचरण काला म्हणाले की, ‘आप’ने आपल्यावर दबाव आणला होता. नेहा मुसावतनेही आपवर असेच आरोप केले आहेत. चंदीगड महापालिकेत ३६ नगरसेवक मिळून महापौरपदाची निवड करतात. सध्याच्या परिस्थितीनुसार, भाजपला 17 नगरसेवक, 1 खासदार (चंदीगड महापौर निवडणुकीत खासदार देखील मतदान करतात) आणि शिरोमणी अकाली दलचे एक नगरसेवक यांचा पाठिंबा आहे.

त्याच वेळी, आप आणि काँग्रेसची मिळून केवळ १७ मते आहेत. त्यामुळे चंदीगढ महानगरपालिकेवर भाजपचा महापौर असेल, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.