आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडीनी वेगळ्या पद्धतीचं वळण आले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना पोलिसांनी अटक केली आहे.चंद्राबाबू नायडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची न्यायालयीन कोठडी 23 सप्टेंबर रोजी संपणार आहे. अटक आणि न्यायालयीन कोठडीच्या विरोधात तेलगू देसम पक्षाने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.महत्वाचीबाब म्हणजे नायडू यांना कथित कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी सीआयडी आणि पोलिसांनी अटक केली होती
एसीबी न्यायालयाचे न्यायाधीश हिमाबिंदू यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना चंद्राबाबू नायडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण आंध्र प्रदेशातील उत्कृष्ट केंद्रांच्या क्लस्टर्सच्या स्थापनेशी संबंधित आहे. त्याच्या प्रकल्पाची अंदाजे किंमत 3300 कोटी रुपये आहे. या कथित फसवणुकीमुळे राज्य सरकारचे 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावाही एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे चंद्राबाबू नायडूंना अटक झाली तेव्हा त्यांचा मुलगा नारा लोकेश पूर्व गोदावरी यात्रेला गेला होता. नारा लोकेश त्याच्या वडिलांना भेटायला जाऊ लागताच त्याला वडिलांना भेटू दिले नाही. यानंतर नारा लोकेशने रस्त्यावरच बसून विरोध करण्यास सुरुवात केली, त्यानंतर पोलिसांनी नारा लोकेशलाही ताब्यात घेतले.