---Advertisement---
जळगाव : राष्ट्रीय विचारांना वाहून घेतलेल्या ‘जळगाव तरुण भारत’च्या निवासी संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दिगंबर जोशी यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.
५५ वर्षीय जोशी पत्रकारितेत गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘गावकरी, ‘जळगाव टाइम्स’, ‘देवगिरी तरुण भारत’ तसेच ‘लोकमत’ या दैनिकांमध्ये यशस्वीपणे काम केले आहे.
दांडगा जनसंपर्क असलेल्या चंद्रशेखर जोशी यांचा राजकारणासोबतच सहकार क्षेत्राचाही अभ्यास आहे. विधानसभा तसेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात त्यांनी लिहिलेली राजकीय वार्तापत्रे तसेच राजकीय विश्लेषण चर्चेचे ठरले आहेत.
सर्जना मीडिया सोल्यूशन्स प्रा. लि. जळगावचे कार्यकारी संचालक रवींद्र लढ्ढा, सचिव संजय नारखेडे, सहसचिव विभाकर कुरंभट्टी व संचालक मंडळाने ही नियुक्ती केली आहे. विविध पुरस्कारांनी सन्मानित जोशीजी यांनी पदभार स्वीकारला तेव्हा संचालक मंडळासह सहकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
---Advertisement---