सध्या जगभरात चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाचे कौतुक सुरु आहे. जगभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. अश्यात नागपुरकरांना आनंद देणारी एक बातमी समोर आली आहे. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या टीममध्ये एका नागपुरकरांचा समावेश राहिला आहे. वयाच्या बाराव्या वर्षीच अंतराळ शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न बघणारा अद्वैत दवने हा एक तप म्हणजेच 12 वर्षानंतर तो चंद्रयान 3 मोहिमेत इसरोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून शामिल झाला आहे. चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञ अद्वैत दवने योगदान होते अद्वैत दवने हा चांद्रयन 3 मोहिमेत सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी असलेल्या टीममध्ये होता.
सॉफ्ट लँडिंगच्या वेळेस अद्वैत दवने मिशन ऑपरेशन कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थिती होता. महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न त्याने वयाच्या बाराव्या वर्षीच पाहिलं होतं.सॉफ्ट लँडिंगच्या वेळेस अद्वैत दवने मिशन ऑपरेशन कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थिती होता. महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न त्याने वयाच्या बाराव्या वर्षीच पाहिलं होतं. इयत्ता नववीला असताना अद्वैतला नासामध्ये स्पेस सायन्सशी संबंधित प्रोजेक्ट करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अद्वैतचे वडील डॉक्टर प्रदीप दवने हे विभागीय फळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ आहेत. तर आई भारती दवने शिक्षिका आहेत.
नागपूरच्या सोमवार शाळेचा विद्यार्थी राहिलेल्या अद्वैतनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे पुढील शिक्षण घेतलं. ऑप्टिकल इंजिनियरिंगमध्ये एम टेक करणारा अद्वैत कॉलेजमध्ये अव्वल राहिला. चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग करता सेन्सरची महत्त्वाची भूमिका होती. या सेंसर टेस्टिंग टीममध्ये अद्वैतचा सहभाग होता. मुलाच्या चांद्रयान तीनच्या मोहिमेतील यशस्वी सहभागनंतर त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता.