Chandrayaan-3: शिवशक्ती पॉइंट’ भोवती रहस्य शोधत फिरतोय प्रज्ञान रोव्हर,बघा व्हिडिओ

नवी दिल्ली:  चांद्रयान-३ ने यश संपादन केले आहे. त्याबद्दल सर्वच क्षेत्रातून चांद्रयान चे कौतुक केले जात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर त्याचा प्रवास सुरू झाला आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर, इस्रोने आता प्रज्ञान रोव्हरशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या ‘शिवशक्ती पॉइंट’ भोवती गुपिते शोधत फिरताना दिसत आहे. ISRO ने लिहिले इथे नवीन काय आहे? याचा शोध घेत प्रज्ञान रोव्हर ‘शिवशक्ती पॉईंट’भोवती फिरत आहे.

यापूर्वी, इस्रोने चांद्रयान-3 शी संबंधित व्हिडिओ ट्विटर वर जारी केला होता, ज्यामध्ये प्रज्ञान रोव्हर लँडर विक्रममधून बाहेर पडताना दिसत आहे. ISRO ने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 मिशन लाँच केले होते. चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. इस्रोच्या यशाबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पीएम मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आणि मिशन चांद्रयान-3 चे यश ऐतिहासिक क्षण असल्याचे वर्णन केले. देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावरून  परतताच विक्रम लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा केली आहे