परिवर्तनाला गती देणारी सामाजिक न्याय परिषद

महाराष्ट्रात प्रबोधनाचा श्रीगणेशा १२ व्या शतकापासूनच सुरू झाला; जो अधिक गतिमान होतोय. आपला प्राचीन समाज सामाजिक मूल्यांविषयी जागृत होतो आहे, ही आनंदाची बाब आहे. आपल्या भारतीय संविधानात सामाजिक मूल्ये व सामाजिक न्याय या तत्त्वांचा प्रामुख्याने अंतर्भाव करण्यात आला आहे. सामाजिक प्रबोधनाचे हे चक्र अधिक गतिमान करण्यासाठी नुकतीच छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विवेक विचार मंचतर्फे सामाजिक न्याय परिषद आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून ३५० प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते. ९५ टक्के प्रतिनिधी अनुसूचित जातीमधील होते. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते झाले.  यावेळी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, बार्टीचे सुनील वारे, शाहू महाराजांचे वंशज समरजीतसिंग घाटगे व विवेक विचार मंचचे संयोजक प्रदीप रावत प्रामुख्याने उपस्थित होते.

“सामाजिक न्यायाची प्रक्रिया अधिक प्रभावशाली होण्यासाठी या मोहिमेत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी विवेक विचार मंचतर्फे दौलतराव खरात, चिखली (जि. बुलढाणा), योगेश शिंदे, वाल्मीक निकाळजे व अमर कांबळे या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. दौलतराव खरात यांनी १९९३ मध्ये नागसेन बुद्ध विहाराची स्थापना केली. विहाराचे सचिव म्हणून कार्यरत असताना ३० वर्षांच्या काळात त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. बुद्ध विहाराच्या जागेत समाजातील सर्व घटकांसाठी गरजू तरुणांसाठी ग्रंथालय व अभ्यासिका चालते. Social Justice Conference सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके आणि प्रशिक्षणही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुभेच्छा देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली तसेच प्रसिद्ध लेखक अंबादास सकट लिखित ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचारदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी बार्टीचे सुनील वारे यांनी विविध योजनांची माहिती देताना बार्टी विद्याथ्र्यांना संघ लोक सेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, अन्य स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकासासाठी मदत करीत असल्याचे सांगितले. तसेच ३५ हजार रुपये दर महिना यूजीसीच्या नियमानुसार फेलोशिप देते व विदेशात नोक-यांसाठी साह्य करते, असेही ते म्हणाले. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांवर विद्यापीठात अनेक उपक्रम राबविले जात असल्याचे नमूद केले. त्यांचे कार्य, जीवनचरित्र आम्हास अनुवादित करायचे आहे. ते रशियन व इटालियन भाषेमध्ये भाषांतरित झाल्याची माहिती त्यांनी दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी  या छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वाचा संदर्भ देत विचार व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या वैचारिक पाठबळामुळेच आपण आज इथवर प्रगती केली आहे, असे राज्याचे मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले. Social Justice Conference अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण सदैव तत्पर असायला हवे, असे ते म्हणाले. डॉ. आंबेडकर, वीर सावरकर व स्वामी विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवण्यास त्यांनी सांगितले.हा प्राचीन समाज बदलत आहे. पण अधिक काही आपणास मिळवायचे आहे. आपल्या समाजात जे सदोष आहे ते बदलले आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, हा सकारात्मक बदल घडविताना आपल्याला सनदशीर मार्गानेच जावे लागेल, असे संयोजक प्रदीप रावत यांनी सामाजिक न्यायाच्या लढाईतील सैनिकांना सांगितले. घटनात्मक मार्गच देशात बंधुत्व निर्माण करू शकतो. आपल्याला माणसे जोडायची आहेत, तोडायची नाहीत. Social Justice Conference जसे कोल्हापूर ही सामाजिक न्यायाची पाठशाळा आहे तसेच वीर सावरकरांनी रत्नागिरीला अस्पृश्यता निर्मूलनासाठी अनेक प्रयोग केले, असे ते म्हणाले.

परिषदेला उपस्थित प्रतिनिधींनी विविध जिल्ह्यांमध्ये घडणा-या जातीय अत्याचारांच्या घटनांचे वर्णन केले. त्यामध्ये लव्ह जिहाद, स्मशान उपयोगासंबंधी अडचणी यांचा समावेश होता. या अडचणी प्रत्यक्षात पाहून त्यावर शासन, सामाजिक संस्था व कार्यकर्ते मिळून समन्वयाचे मार्गाने मात करायला हवी, असे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

याप्रसंगी मुंबईचे भीम आर्मीचे कार्यकर्त गायकवाड यांनी एका हृदयद्रावक घटनेचे वर्णन केले. इकबाल नावाच्या मुस्लिम व्यक्तीचा विवाह चंदनशिवे नावाच्या मुलीसोबत होतो. लग्नानंतर काही दिवसातच त्याने पत्नीला नमाज व बुरखा घालण्यासाठी गळ घातली. तिने नकार देताच तिला मुंबईत भर रस्त्यावर आणून चराचरा कापले असताना मदतीस केवळ रा. स्व. संघाचे लोक आले. म्हणून आता सर्वांनी एकमेकांशी उत्तम संबंध प्रस्थापित करायला हवा. जाती अभिमान त्यागायला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. नांदेड जिल्ह्यात मातंग मुलींना मोठ्या प्रमाणात मुस्लिम विविध मार्गांनी आकर्षिक करीत आहेत, असे एक कार्यकर्ता म्हणाला. नागपूरचे नेताजी गजभिये यांनी मुस्लिमांच्या तावडीत सापडलेली हलबा मुलगी समन्वयाच्या मार्गाने सोडवून आणल्याचा उल्लेख केला. विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या माध्यमातून आयोजित या राज्यव्यापी सामाजिक न्याय परिषदेत अनुसूचित जाती-जमाती घटकांना पक्की घरे मिळावी याकरिता ठराव मांडण्यात आला

तसेच शासनाने अथवा न्यायालयाने अनुसूचित जातींसाठी असलेले राखीव आरक्षण कुठल्याही परिस्थितीत ख्रिश्चन अथवा मुस्लिम धर्मांतरित झालेल्या कोणालाही देण्याचा प्रयत्न करू नये. Social Justice Conference ज्या ख्रिश्चन अथवा मुस्लिम संघटना असे करीत आहेत या सर्वांचा ही परिषद तीव्र निषेध करीत आहे. ख्रिश्चन अथवा मुस्लिम धर्मात धर्मांतरित झालेल्याचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करता कामा नये, असा ठराव या सामाजिक न्याय परिषदेत सर्वसंमतीने पारित करण्यात आला. ही परिषद विवेक विचार मंच विदर्भ प्रांत संयोजक सुनील किटकरू, अतुल शेंडे, जनसंपर्क समितीचे दत्ता शिर्के, आंबेडकर थॉट असोसिएशनचे महाराष्ट्र समन्वयक मनीष मेश्राम यांच्या अथक प्रयत्नाने व नेतृत्वात संपन्न झाली.

– सुनील किटकरू