राष्ट्रीय लोक अदालतच्या तारखेत बदल

जळगाव : ५ मे व १४ सप्टेंबर रोजी होणारी राष्ट्रीय लोक अदालतच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. हा बदल महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई
सदस्य सचिव यांच्या आदेशांन्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांच्या निर्देशांन्वये जळगाव जिल्हयात ५ मे व १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार सुधारीत तारीख २७ जुलै व २८ सप्टेंबर अशा आहेत तरी याची नोंद सर्व विधीज्ञ , पक्षकार, बॅक, फायनान्स कंपनी व सर्व संबंधीत शासकीय विभाग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सेवा प्राधिकरण अधिक्षक सुभाष पाटील यांनी केले आहे.