जळगाव : महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी पल्लवी भागवत रूजू झाल्यामुळे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवार, 27 डिसेंबर रोजी सात अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल केला आहे. सामान्य प्रशासनाचा कार्यभार आता अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे सोपीवला आहे. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त असलेले अविनाश गांगोडे यांच्याकडे आता आरोग्य विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यभार देण्यात आला आहे.
महापालिकेत आता शासकीय अधिकाऱ्यांच्या सर्व रिक्त जागांवर शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
अतिरीक्त आयुक्तांसह उपायुक्त, सह आयुक्तांना दिले वित्तीय अधिकार
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवार, 27 डिंसेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार अतिरीक्त आयुक्त, उपायुक्त यांना तीन लाखापर्यंतच्या तर सहाय्यक आयुक्तांना एक लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे व सर्व प्रकारच्या आर्थिक बिलांवर स्वाक्ष्ाऱ्या करण्याचे वित्तीय अधिकारी दिले आहेत.
असा केला कार्यभारात बदल
पल्लवी भागवत – अतिरीक्त आयुक्त (सामान्य प्रशासन (अंतर्गत प्रमुख कार्यालय जनगणना, अभिलेखे, बारनिशी, जनसंपर्क, टेलिफोन) प्रकल्प विभाग पाणीपुरवठा विभाग, भांडार विभाग, क्रीडा विभाग.)
अविनाश गांगोडे – उपायुक्त (आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, मलेरिया विभाग, दवाखाना विभाग, अतिक्रमण विभाग, आस्थापना, शिक्षण विभाग, अग्निशमन, निवडणूक.)
निर्मला गायकवाड -उपायुक्त (महसूल, प्रभाग समिती क्रमांक एक ते चार, मार्केट वसुली, खुला भूखंड विभाग, घरकुल, एलबीटी, मिळकत व्यवस्थापन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिव्यांग विभाग, एनयुएलएम.)
गणेश चाटे – सहाय्यक आयुक्त (महसूल, प्रभाग समिती एक ते चार, मार्केट वसुली, खुला भूखंड विभाग, घरकुल, एलबीटी, मिळकत व्यवस्थापन विभाग महिला व बालकल्याण विभाग दिव्यांग विभाग एनयुएलएम) समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्त महसुल हे काम पाहतील.
अभिजीत बाविस्कर – सहाय्यक आयुक्त (आस्थापना, शिक्षण विभाग (समन्वयक अधिकारी उपायुक्त आरोग्य), भांडार विभाग, क्रीडा विभाग, ग्रंथालय, विधी विभाग.( समन्वय अधिकारी अतिरिक्त आयुक्त)
अश्विनी गायकवाड- सहायक आयुक्त (बांधकाम विभाग, विद्युत विभाग (समन्वय अधिकारी आयुक्त)
उदय पाटील- सहाय्यक आयुक्त (दवाखाना विभाग, मलेरिया विभाग,(समन्वय अधिकारी उपायुक्त आरोग्य)