रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय ! भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्यांच्या रचनेत बदल

जळगाव : भारतीय रेल्वे प्रशासनाने भुसावळ मार्गे धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांच्या रचनेत आणि गाडी क्रमांकात बदल केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -आसनसोल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस -गोडा एक्सप्रेस यांची रचना सुधारण्यात आली आहे. या सुधारणांमुळे प्रवाश्यांना अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

सुधारित गाडी क्रमांक आणि रचना

सुधारित गाडी क्रमांक 82356 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पाटणा सुपरफास्ट एक्सप्रेस 04 मार्च 2025 पासून सुधारित गाडी क्रमांक 22360 सह धावेल. तसेच 82355 पाटणा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस 02 मार्च 2025 पासून सुधारित गाडी क्रमांक 22359 सह धावेल. सुधारीत रचनेत 2 वातानुकूलित द्वितीय, 5 वातानुकूलित तृतीय, 5 तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, 6 स्लीपर क्लास, 1 गार्ड्स ब्रेक व्हॅन, 1 एसी पँट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन यांचा समावेश आहे.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

आसनसोल एक्सप्रेस

12362 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -आसनसोल एक्सप्रेस 22 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावेल. याचप्रमाणे 12361 आसनसोल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 19 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने आसनसोल येथून धावत आहे. या गाडीच्या सुधारित रचनेत 2 वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 7 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास, 1 गार्ड्स ब्रेक व्हॅन, 1 एसी पँट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा

भागलपूर व गोडा एक्सप्रेस

12336/12335 लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस 19 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने लोकमान्य टिळक टर्मिनस येथून व 17 जानेवारी 2025 पासून भागलपूर येथून धावत आहे. तसेच 22312 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोडा एक्सप्रेस 23 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने एलटीटी येथून धावेल. यामध्ये सुधारीत रचना 2 वातानुकूलित द्वितीय, 5 वातानुकूलित तृतीय, 8 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास, 1 गार्ड्स ब्रेक व्हॅन, 1 एसी पँट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन यांचा समावेश आहे.

Pune News : अखेर पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या पतीला मिळाला न्याय

महत्वाची सूचना

प्रवाशांनी तिकीट आरक्षण करत असताना या बदलांची नोंद घ्यावी. गाड्यांच्या थांब्यांवरील वेळा तपशीलवार पाहण्यासाठी प्रवाश्यांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करून वेळापत्रकांची माहिती घेऊ शकतात.