---Advertisement---
---Advertisement---
Changur Baba: धर्मांतर सिंडिकेटचा मुख्यसूत्रधार जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबा याला अटक झाली आहे. असे असले तरी त्याच्या कटाचा फटका बसलेले अनेक कुटुंबे दारोदारी भटकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चांगूर बाबा भोवती कायद्याचा फास घट्ट झाला आहे. यानंतर देशातील विविध भागातील पीडित आता पुढे येऊ लागले आहेत. यात त्याने केलेल्या दुष्कृत्यांचे जाळे उत्तर प्रदेशातील गोंडा ते मुंबई आणि कर्नाटकपर्यंत पसरले आहे. ही दुष्कृत्ये आता उघड होऊ लागली आहेत.
अनिल सोनी हा गोंडांचा रहिवाशी आहे. फेब्रुवारीमध्ये त्याची बहीण रुपाली (वय २०) ही प्रयागराजला कुंभ स्नानासाठी गेली होती. परंतु, ती तेथून परत आलीच नाही. त्याच्याकडे रुपालीचा कुंभ मेळ्यात काढलेला फोटो आहे. त्याने आरोप केला आहे की शेजारच्या गावातील शहाबुद्दीन अन्सारी याने त्याच्या बहिणीचे अपहरण केले.
शहाबुद्दीन हा चांगूर बाबाचा गुंड आहे. अनिल म्हणतो की त्याची बहीण धर्मांतरित झाली आहे, परंतु आजपर्यंत ती जिवंत आहे की नाही याची त्याला कल्पना नाही. त्याचप्रमाणे कर्नाटकामधील चेनारामची कहाणी देखील हृदय पिळवटून टाकणारी आहे. त्याची १९ वर्षांची भाची लाखो रुपये घेऊन घरातून अचानक गायब झाली. कुटुंबातील सदस्यांनी तिचा शोध घेतला असता मुरादाबाद येथील रहिवासी मुबारक अली याने चेनारामच्या भाचीला आमिष दाखवून नेल्याचे समजले.
याप्रकरणांत चांगूर बाबाच्या धर्मांतर सिंडिकेटच्या नाव समोर आले आहे. . यूपी एसटीएफच्या तपासात या सिंडिकेटबद्दल अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. चांगूर बाबाची टोळी धर्मांतराद्वारे हिंदू समाजाचे इस्लामीकरण करण्याचा एक मोठा आणि भयानक कट रचत होती. या कटाचा सर्वात खोल परिणाम मुंबईत दिसून आला. बॉलिवूड नृत्यदिग्दर्शक बालाजी सावरकर म्हणतात की साकीनाका परिसरातून हिंदू कुटुंबांचे स्थलांतर झपाट्याने वाढले आहे. ते असा दावा करतात की चांगूर बाबाच्या गुंडांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवरही कब्जा केला आहे. बालाजी म्हणतात की सरकारला वारंवार आवाहन करूनही महाराष्ट्र सरकार त्यांचे ऐकत नाही.
चांगूरचे जाळे इतके विस्तृत आहे की पीडित लोक सतत त्यांच्या तक्रारी नोंदवत आहेत. विश्व हिंदू रक्षा परिषदेच्या कार्यालयात तक्रारदारांची गर्दी दररोज वाढत आहे. कॉल सेंटरवर येणाऱ्या तक्रारीच नव्हे तर थेट कार्यालयात पोहोचणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीवरून असे दिसून येते की चांगूरच्या जाळ्याने हजारो कुटुंबांना वेठीस धरले आहे.