अराजकतेचा कहर! बांगलादेशात भारतीय हिंदू तरूणाला कट्टरपंथीयांकडून मारहाण

#image_title

धाका : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अल्पसंख्यांक हिंदू समाजावरील अत्याचाराने आता कळस गाठल्याची चिन्हं आहेत. कोलकाता मध्ये निवास करणाऱ्या सयान घोष जेव्हा काही कामानिमित्त धाकाला गेला होता, त्या वेळेस त्याला त्याचा धर्म कोणता हे विचारून काही कट्टरपंथीयांनी मारायाला सुरूवात केली.

बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर चालू असलेल्या हल्ल्यांदरम्यान, सयान घोष नावाच्या भारतीय हिंदू व्यक्तीने त्याच्या धार्मिक ओळखीबद्दल बांगलादेशात त्याच्यावर कसा हल्ला केला गेला हे सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना सयान म्हणाला ” काही स्थानिक रहिवासी माझ्याजवळ आले व माझी विचारपूस करू लागले. तेव्हा त्यांना मी सांगितले की मी भारतीय आहे. त्यांनी माझ्या धर्माबद्दल विचारले तेव्हा मी त्यांना सांगितले की मी हिंदू आहे. त्यानंतर त्यांनी मला कडेवर घेऊन बेदम मारहाण केली. त्यांनी माझा मोबाईल, पैसे आणि इतर सामान हिसकावून घेतले.त्यांनी माझ्या तोंडावर चाकूने वार केले. तसेच माझ्या डोक्यात दगड घातला.”

सायन घोष हा कोलकत्याच्या बेलघरिया परिसरातील रहिवासी आहे. यावर्षी २३ नोव्हेंबर रोजी तो आपल्या मित्रासह ढाका येथे गेला होता.घोष खरेदीसाठी बाहेर असताना ५ ते ७ जणांच्या टोळक्याने त्याची विचारपूस केली. तो हिंदू हे लक्ष्यात येताच त्याच्यावर हल्ला केला गेला.“तुम्ही भारतीय हिंदू आहात. आमच्या देशात का आलास,” असे प्रश्न ते घोष याच्यावर तुटून पडले. त्याला वाचवायला कोणीही आले नाही. बांगलादेशाच्या पोलिसांनी सुद्धा बोटचेपेपणाची भूमिका घेतली गेली.