---Advertisement---
जळगाव: सध्या राज्यभरात बीड जिल्हा हा गुन्हेगारीच्या दृष्टीने चांगलाच चर्चेत आला आहे. मागील अनेक महिन्यात बीड जिल्ह्यातून खून ,अपहरण, खंडणी, तसेच मारहाणीसारख्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असेच काहिसे गुन्हेगारीचे सत्र जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील बोदवड येथे ४३ वर्षीय आचाऱ्याला हात बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. हॉटेलात चोरी केल्याच्या संशयावरून हि मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संदेश बुंदेले (वय २४), मनीष वंजारी दोघे राहणार बोदवड, असं अटक केलेल्यांची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बोदवड शहरातील मलकापूर रोडवरील राजवीर हॉटेलमध्ये भागवत ओंकार शिंदे हे आचारी काम करत होते. यापूर्वी ते जामनेर रोडवरील साकी हॉटेलमध्ये कामाला होते. १८ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिंदे हे राजवीर हॉटेलमध्ये काम करत असताना संदेश अरुण बुंदेले हा तेथे आला. पूर्वी शिंदे हे बुंदेलच्या हॉटेलमध्ये काम करत होते म्हणून त्यांची ओळख होती. संदेश हा राजवीर हॉटेलमध्ये आल्यानंतर शिंदेला दुचाकीवर बसवून त्याच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याचा चुलतभाऊ मनीष वंजारी हा उपस्थित होता.
यानंतर मनीष व संदेश यांनी तू आमच्या हॉटेलमध्ये कामाला असताना खूपवेळा चोरी केली आहे असा आरोप केला. संदेशने शिंदेचे हात बांधले व त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याला चापट-बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. यानंतर मनीष याने खाट विणण्याच्या दोरीने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी तेथे वैभव व कल्पेश (पूर्ण नाव माहिती नाही) दे दोघे तेथे आले. आणि त्यानीही शिंदे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. १८ मार्च रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
आरोपींच्या ताब्यातून सुटलेल्या नंतर शिंदेनी थेट बोदवड पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी संदेश बुंदेले, मनीष वंजारी या दोघांना अटक केली. या प्रकरणात त्याना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
---Advertisement---