Chhagan Bhujbal : “मैं मौसम नहीं, जो पल में बदल जाए…”, म्हणत भुजबळांनी व्यक्त केला रोष

नाशिक ।  छगन भुजबळ यांच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी आणि समता परिषद व भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांची असंतोषाची स्थिती वाढली आहे. आज समता परिषदेच्या मेळाव्यातून, शेरोशाहीरीतून भुजबळांनी आपल्या राजकीय भूमिकेबद्दल एक स्पष्ट संदेश दिला आहे.

“रस्ता तो मेरा है” असे सांगून, भुजबळांनी आगामी काळात रस्त्यावर लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे त्यांचे आगामी राजकीय पाऊल किती प्रभावी ठरू शकते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ?
लोकांची मन खिन्न आहेत काल पासून मी हे बघतोय. कोणीतरी गेल्या सारखी अवस्था आहे. लोकांना धक्का बसला आहे, कोणी त्यातुन बाहेर येत नाही. ही गोष्ट येवला, लासलगाव पूर्ती नाही तर संपूर्ण राज्यात आहे.

संपूर्ण देशातून फोन येत आहेत. सर्वाची मागणी आहे, तुम्ही आमच्या शहरात जिल्ह्यात, राज्यात या, लोक पेटून उठत आहेत. मात्र आपण पेटवा पेटवी करायची नाही. तुम्ही निषेध करा, पण जोडे मारो, शिव्या नको.

रोज सकाळी 8 वाजता काय चालू आहे, त्याची सगळी माहिती मुख्यमंत्रीपासून सर्वांना होत आहे. इथे सुद्धा मराठा नेते आहेत, निवडणुकीचे सारथ्य देखील मराठा समाजाच्या नेत्यांनी केले.

आजही त्यांचे फोन येतात. फुलेंनी शाळा सुरू केली तेव्हाची भिडे यांनी वाडा दिला ते ब्राह्मण होते. काही लोक छोट्या मनोवृत्तीचे होते. पण सपोर्ट करण्यांत मुस्लिम तसेच ब्राह्मण समाजाचे लोक ही होते. सर्व आपले दुष्मन नाही,आपल्याला संपवायला निघाले त्यांना आमचा विरोध आहे.

आता पुन्हा मला सांगतात राज्यसभेत जा. मात्र, ज्यांनी माझ्यासाठी जिवाचं रान केले ते डोके फोडून घेतील. मग आधीच उभे करायला नको होते ना, मी माझ्या लोकांना आता सोडू शकत नाही. प्रफुल्ल पटेल यांनी मध्यस्थी केली, अजित पवार बोलले बसून चर्चा करू, पण अशी बैठक झालीच नाही.

प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांनी भुजबळ यांना घ्या असे सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शेवट पर्यंत प्रयत्न केल्याचे सांगितले. दुसऱ्या पक्षातील कोणी सांगितले नाही, पवार साहेबांकडचे फोन आले, बावनकुळे यांचे फोन त्यांना आले. मात्र काहीही झाले नाही. मात्र आता समाजाची ढाल बनून कोण उभा राहील, हा प्रश आहे.

आता सर्व दिल्यानंतर असे का प्रश्न उभा होत आहे? या मागे तुमचा हेतू काय? अवहेलना करण्याचे शल्य मनात आहे. उद्या, परवा मी मुंबईला जाणार आहे, आपले ओबीसी नेते फोन करत आहेत, ते भेटायला येणार आहेत. त्याच्याशी चर्चा करून निर्णय घेणार, त्यावेळी तुमची साथ मला हवी आहे.

छगन भुजबळ यांनी “मैं मौसम नहीं जो पल में बदल जाए, मैं ऊस पुराणे जमाने का सिक्का हु” असे म्हणत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ठामतेचे प्रतीक दिले आहे, ज्यात ते स्पष्टपणे सांगत आहेत की ते विश्वास आणि स्थिरतेच्या प्रतीक आहेत, जे हलक्या फुलक्या निर्णयांना स्वीकारत नाहीत.