Chhattisgarh : मोठ्या घातपाताच्या घटना घडवण्याच्या बेतात असलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा

कांकेर : शनिवार 24 फेब्रुवारीला सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी जंगलात झडती घेतली असता यात एका नक्षलवाद्याचा मृतदेह आणि काही स्फोटक साहित्यासह शस्त्र सापडून आले होते. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या घातपाताच्या घटना घडवण्याच्या बेतात असलेले काही नक्षली कांकेर येथील कोयलीबेडा परिसरातील जंगलात जमल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती

त्यात आधारावर कांकेर येथील कोयालीबेडा परिसरात पोलिसांकडून नक्षलवाद्यांच्या ठिकाणांचा शोध घेत असता , पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल. यात 3 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून इतर काही नक्षली जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. यात डीआरजी आणि बीएसएफने संयुक्त ऑपरेशन राबवित नक्षलवाद्यांच्या छुप्या कारवाईचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.