जळगाव : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास शासन निर्णय दि.२८.०६.२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली होती. आज मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेबाबत काही निकषांमध्ये बदल करण्यात आले असून त्या बाबतचा सुधारित शासन निर्णय शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाने जरी केला आहे. त्यनुसार जळगाव जिल्ह्याच्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे असणार आहे. तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काम पाहतील. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे.
अशी असेल जिल्हास्तरीय समिती
अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हासातीय समिती गठीत करण्यात येणार आहे. सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काम पाहतील या जिल्हास्तरीय समिती मध्ये सह अध्यक्ष म्हणून संबंधित जिल्हयाचे मंत्री, सदस्य म्हणून सात प्रशासकीय अधिकारी राहतील यात परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, नगर प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त, जिल्हयातील महानगरपालिकाचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी (उप आयुक्त दर्जापेक्षा कमी नसावे.), जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हयातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, संबंधित एकात्मिक बाल विकासाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचा समावेश आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर समितीची दरमहा बैठक आयोजित करण्यात येणार असून या समितीद्वारे सदर योजनेवी देखरेख व संनियंत्रण करणे. सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा नियमित आढावा घेतला जाणार असून आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. कालबध्द पध्दतीने पात्र लाभार्थीची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता या बैठकीत घेतली जाणार आहे.