मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल…

पाटणा : शनिवारी सकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाताला अचानक वेदना होऊ लागल्या. त्यांना तात्काळ पाटणा येथील मेदांता रुग्णालयात नेण्यात आले जेथे ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. नितीश कुमार बराच काळ निवडणुकीमध्ये व्यस्त होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पाटणा येथील मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. हाताला असह्य दुखत असल्याने त्यांना तात्काळ मेदांता रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर अस्थिव्यंग विभागात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सीएम नितीश कुमार यांच्या हाताला अचानक वेदना होऊ लागल्या. त्यांना तात्काळ पाटणा येथील मेदांता रुग्णालयात नेण्यात आले जेथे ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली.

नितीश कुमार बराच काळ निवडणुकीमध्ये व्यस्त होते. त्यानंतर एडीएचा महत्त्वाचा घटक म्हणून त्यांचा पक्ष जेडीयूने केंद्र सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अनेकवेळा दिल्लीला भेट दिली. 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यातही ते सहभागी झाले होते.

दिल्लीहून पाटण्याला परतलेल्या नितीश कुमार यांनी शुक्रवारीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. दरम्यान, जेडीयूने 29 जून रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यासाठीची तयारीही सुरू आहे.