मुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीच्या वाटेवर ?

#image_title

राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष्यांची जोरदार कंबर कसली आहे. राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षात जागा वाटपाची चर्चा सुरु आहे . २ ० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अश्यातच मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

२०२२ साली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी यांनी शिवसेनेत बंड करून सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीचा दौरा केला होता. सत्तांतराच्या हालचालीत गुवाहाटीचा दौरा चांगलाच गाजला होत. गुवाहाटीतील्या रिसॉर्टमध्ये राहून कामाख्या देवीच्या दर्शनाला जात असतानाचे त्यावेळचे अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गुवाहाटीचा मुद्दा गाजला होता.


आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचे कळते. प्रचाराचा नारळ कामाख्या देवीच्या मंदिरात फोडल्यानंतर ते राज्यात प्रचारचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जाते.

गुवाहाटीमधील ऐतिहासिक महत्त्वाची आणि धार्मिक स्थळ असलेली कामाख्या देवीची मंदीर हे शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. निवडणुकांच्या तोंडावर कामाख्या देवीच्या आशीर्वादाने शिंदे यांना यश मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.