मूख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा २४ तासात राजीनामा घ्यावा, अन्यथा…, अंजली दमानीयांचा इशारा

---Advertisement---

 

पुण्यातील जमीनिच्या गैरव्यवहार प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासांच्या आत अजित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी विनंती अंजली दमानिया यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या कि जर मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत अजित पवारांचा राजीनामा घेतला नाही, तर मी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेईन. गृहमंत्री म्हणून अमित शहांनी ना खाऊंगा ना खाने दूंगाचे आश्वासन दिले होते. असे अंजली दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अमेडिया कंपनीशी संबंधित जमीन व्यवहारावर लक्ष केंद्रित केले. ज्यात अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांची भागीदारी असल्याचा आरोप आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरू राहिल. कंपनीने जमीन विकत घेण्यासाठी अर्ज केला नसून कंपनी सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. असा मोठा खुलासा अंजली दमानिया यांनी केला.

शितल तेजवानी यांच्यासोबत झालेल्या टर्म शीटमध्ये ४० एकर जमीन ५ वर्षांच्या करारावर डेटा सेंटर आणि आयटी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अमेडिया कंपनीला दिल्याचे दाखवण्यात आले आहे. जमीन खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी माफ नाही, फक्त बिल्डिंगमध्ये सूट मिळते. त्यामुळे लेटर ऑफ इंटेंट हा फ्रॉड आहे. हा सरळ सरळ जमीन बळकावण्याचा प्रकार आहे. कंपनी केवळ ९८ लाखांची गुंतवणूक करून डेटा सेंटर सुरू करणार असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.त्यामुळे पार्थ पवारांवर तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावी. कंपनीत त्यांची ९९ टक्के भागीदारी असतांनादेखील त्यांच्यावर गुन्हा का नोंदवला जात नाही, असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. शितल तेजवानी, सूर्यकांत येवले आणि दिग्विजय पाटील यांना तातडीने ताब्यात घेतले पाहिजे. या गैरव्यवहाराची सर्व कागदपत्रे आणि पुरावे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दिली आहेत. जर अजित पवारांनी राजीनामा दिला नाही, तर गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---