State Budget 2024 updates : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर; कधी पासून होणार लागू ?

राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प आज शुक्रवारी सादर होत आहे. यात अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. ही योजना जुलै महिन्यापासून लागू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मध्ये प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना जाहीर करण्यासाठी अलिकडेच राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशला पाठवले होते. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते ? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे ? याचा या पथकाने अभ्यास केला आहे. त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रात जाहीर करण्यात आली आहे. ही योजना जुलै महिन्यापासून लागू होणार असल्याची माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

काय आहे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना ?
या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. दारिद्रयरेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. महिलांना आर्थिक दृष्ट्‍या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे.